टीव्हीचा रिचार्ज संपताच पत्नी केली माहेरी; मागितला तलाक, म्हणाली 'TV नहीं तो बीवी नहीं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2022 13:02 IST2022-07-01T13:00:31+5:302022-07-01T13:02:25+5:30

डिश टीव्हीचा रिचार्ज संपल्याने पत्नी आपलं सासर सोडून माहेरी निघून गेली. नवऱ्याची चूक फक्त इतकीच होती की त्यावेळी रिचार्ज करण्यासाठी त्याच्या खिशात पैसे नव्हते.

bilaspur dispute between husband and wife after recharge of dish ends said tv nahi to biwi nahi | टीव्हीचा रिचार्ज संपताच पत्नी केली माहेरी; मागितला तलाक, म्हणाली 'TV नहीं तो बीवी नहीं'

टीव्हीचा रिचार्ज संपताच पत्नी केली माहेरी; मागितला तलाक, म्हणाली 'TV नहीं तो बीवी नहीं'

नवी दिल्ली - पती-पत्नीमध्ये विविध गोष्टींवरून भांडणं ही होत असतात. काही वाद हे टोकाला जातात. पण तुम्हाला जर कोणी टीव्हीच्या रिचार्जवरून वाद झाला आणि थेट पत्नीने तलाक मागितल्याचं सांगितलं. तर सुरुवातीला तुमचा विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. अशीच एक अजब घटना आता समोर आली आहे. छत्तीसगडच्या बिलासपूरमध्ये ही घटना घडली असून हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचलं आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिश टीव्हीचा रिचार्ज संपल्याने पत्नी आपलं सासर सोडून माहेरी निघून गेली. नवऱ्याची चूक फक्त इतकीच होती की त्यावेळी रिचार्ज करण्यासाठी त्याच्या खिशात पैसे नव्हते. संध्याकाळी कामाहून परतल्यानंतर रिचार्ज करतो, असं त्याने सांगितलं. यामुळे पत्नी माहेरी गेली. कारण तिला टीव्हीशिवाय एक क्षणही तिथं राहायचं नव्हतं.  टीव्ही नहीं तो बीबी नहीं असं तिने आपल्या पतीलाही सांगितलं होतं.

काऊन्सिंगदरम्यान बायकोने सांगितलेलं घटस्फोटाचं कारण ऐकून पोलिसांना धक्काच बसला. बिलासपूर महिला पोलीस ठाण्यातील समुपदेशक नीता श्रीवास्तव यांनी सांगितलं, फक्त 250 रुपयांचा टीव्हीचा रिचार्ज न केल्याने पत्नी माहेरी निघून गेली, हे ऐकून आम्हीही हैराण झालो. या छोट्याशा गोष्टीवरून पती-पत्नी इतका वाद झाला की प्रकरण तलाकपर्यंत पोहोचलं.

या दाम्पत्याचं समुपदेशन करण्यात आलं आहे. पती-पत्नी दोघांनाही समजावण्यात आलं. काऊन्सलर नीता यांनी सांगितलं की, किरकोळ वाद होणं हा आयुष्याचा भाग आहे. पण वाद इतका मोठा करायला नको. काही दिवसांच्या काऊन्सिलिंगनंतर नवरा-बायको दोघांनीही समुपदेशकांचं ऐकलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: bilaspur dispute between husband and wife after recharge of dish ends said tv nahi to biwi nahi

टॅग्स :marriageलग्न