बसखाली दुचाकी आली अन् उडाला भडका; २० जण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 09:16 IST2025-10-25T09:16:28+5:302025-10-25T09:16:59+5:30
मृतांमध्ये दोन बालके आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे.

बसखाली दुचाकी आली अन् उडाला भडका; २० जण ठार
लोकमत न्यूज नेटवर्क, कुर्नूल (आंध्र प्रदेश) : बंगळुरूला जाणाऱ्या एका खासगी बसला शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास एक दुचाकी धडकल्यानंतर भीषण आग लागून २० जण जिवंत जळाले. इंधन टाकीचे झाकण उघडे असलेली दुचाकी बसखाली गेल्यानंतर आग भडकून ही थरारक घटना घडली. काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारून जीव वाचवला.
बसमधून ४४ जण प्रवास करत होते. जळालेल्या बसमधून १९ मृतदेह बाहेर काढले आहेत. मृतांमध्ये दोन बालके आणि दुचाकीस्वाराचा समावेश आहे.
प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडल्या
दुर्घटनेतून बचावलेल्या प्रवाशांनी या थरारक प्रसंगाबद्दल सांगितले की, जीव वाचवण्यासाठी खिडकीच्या काचा फोडल्या. आम्ही कसेबसे बाहेर पडलो. बसमधील बेड, पडदे बनवण्यासाठी वापरले जाणारे काही साहित्य ज्वलनशील होते. त्यामुळे जास्त भडका उडाला.