Bihars grand alliance is a piecemeal gang says BJP president Nadda | बिहारातील महाआघाडी म्हणजे ‘टुकडे-टुकडे गँग’, भाजपाध्यक्ष नड्डा यांनी बदलली प्रचाराची दिशा

बिहारातील महाआघाडी म्हणजे ‘टुकडे-टुकडे गँग’, भाजपाध्यक्ष नड्डा यांनी बदलली प्रचाराची दिशा

नवी दिल्ली : राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भाकप (माले) सह डाव्या पक्षांची महाआघाडी म्हणजे ‘टुकडे-टुकडे गँग’ व शहरी नक्षलवादीच असल्याची टीका करीत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी बिहार विधानसभा निवडणुकीत प्रचाराची दिशा बदलली. 

यापूर्वी त्यांची भाषणे राजद सरकारच्या गैरकारभाराभोवती घुटमळत होती. आरा आणि बक्सर येथे प्रचार सभांत नड्डा म्हणाले, ही महाआघाडी  देशासाठी अत्यंत घातक आहे. समाजात फूट पाडून सामाजिक सौहार्द्र बिघडवणे, हेच त्यांचे काम आहे. तुमच्या मतामुळे राज्यातील शांतता भंग पावायला नको. ते म्हणाले की, तेजस्वी यादव यांना  त्यांच्या आजूबाजूला काय सुरू आहे, याची किंचितही कल्पना नाही. भाकप (माले)ला १९ जागा मिळाल्या आहेत. कुठे आहेत? राजद? तुम्हाला माहीत आहे? का शहरी नक्षली कोण आहेत? यांना तुम्ही सत्ता सोपवणार का?
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Bihars grand alliance is a piecemeal gang says BJP president Nadda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.