धक्कादायक! पाटण्यात 2 मुलींना 5 मजली इमारतीवरून फेकलं, एकीचा मृत्यू; भडकलेल्या लोकांनी केली तुफान जाळपोळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2022 20:12 IST2022-02-03T20:10:27+5:302022-02-03T20:12:26+5:30
या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरीकांना राग अनावर झाला आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली. संतप्त लोकांनी अनेक वाहने जाळली.

धक्कादायक! पाटण्यात 2 मुलींना 5 मजली इमारतीवरून फेकलं, एकीचा मृत्यू; भडकलेल्या लोकांनी केली तुफान जाळपोळ
बिराहची राजधानी पाटणा येथे गुरुवारी सायंकाळच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली. येथे एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून दोन मुलींना खाली फेकण्यात आले. यात एका मुलीचा मृत्यू झाला तर दुसऱ्या मुलीला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरीकांना राग अनावर झाला आणि त्यांनी जाळपोळ सुरू केली. संतप्त लोकांनी अनेक वाहने जाळली. पोलीस संतप्त लोकांना शांत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
सांगण्यात येते की, बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाजार समितीजवळील शिवशक्ती नगर येथील एका पाच मजली इमारतीच्या छतावर काही बदमाश लपून बसले होते. यादरम्यान कपडे टाकण्यासाठी गेलेल्या दोन मुलींना या बदमाशांनी छतावरून खाली फेकले. यात एका मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुसरीला पीएमसीएचमध्ये दाखल करण्यात आले आहे.
या दोघीही एक फळ विक्रेता नंदलाल गुप्ताच्या मुली आहे. शालू (10वर्ष) आणि सलोनी (12वर्ष) अशी या मुलींची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेत परिसरात तोडफोड आणि तुफान जाळपोळ केली. या दरम्यान लोकांनी एक युवक पकडून पोलिसांच्या हवाली केले आहे.