आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75% करणार, बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी मांडला प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 04:59 PM2023-11-07T16:59:40+5:302023-11-07T17:00:13+5:30

बिहारमध्ये जातीय जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर केला.

Bihar Reservation News: Bihar CM Nitish Kumar's big announcement to increase the extent of reservation from 50 to 75% | आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75% करणार, बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी मांडला प्रस्ताव

आरक्षणाची मर्यादा 50 वरुन 75% करणार, बिहारचे सीएम नितीश कुमार यांनी मांडला प्रस्ताव

Bihar Reservation News: बिहार सरकारने राज्यातील जातीय जनगणनेचा सविस्तर अहवाल मंगळवारी विधानसभेत सादर केला. यावर चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मोठी घोषणा केली आहे. नितीश कुमारांनी राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50 टक्क्यांवरून 75 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

सीएम नितीश कुमारांनी बिहारमध्येआरक्षण 50 वरुन 65 टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला. EWS च्या 10 टक्के आरक्षणासह हा आकडा 75 टक्के होईल. याआधी विधानसभेत जातीवर आधारित जनगणनेवर बोलताना मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, हे काम पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आले आहे. काही जातींची संख्या वाढली किंवा कमी झाली, यावर उपस्थित केला जाणारा प्रश्न अतिशय बोगस आहे, असंही ते यावेळी म्हणाले.

आरक्षणाची व्याप्ती कशी वाढणार?
- सध्या SC साठी 16 टक्के आरक्षण वाढवून 20 टक्के केले जाणार आहे.
- एसटी 1 टक्‍क्‍यांवरून 2 टक्‍क्‍यांपर्यंत वाढणार
- ईबीसी (अत्यंत मागास) आणि ओबीसी यांना मिळून 43 टक्के आरक्षण दिले जाईल.

महिला साक्षरतेबाबत विचित्र विधान
चर्चेदरम्यान मुख्यमंत्री नितीश म्हणाले की, बिहारमध्ये महिलांची साक्षरता वाढली आहे. मुली शिक्षित झाल्या तर लोकसंख्याही नियंत्रणात येईल. या वक्तव्यादरम्यान महिला आमदार संतप्त झाल्या, तर इतर काही आमदार हसत होते.

Web Title: Bihar Reservation News: Bihar CM Nitish Kumar's big announcement to increase the extent of reservation from 50 to 75%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.