लज्जास्पद! अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकांसह 18 जणांकडून 7 महिन्यांपासून बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 09:02 IST2018-07-07T08:56:22+5:302018-07-07T09:02:31+5:30

18 आरोपींपैकी 4 जण अटकेत; 14 जणांचा शोध सुरू

in bihar principal two teachers and 15 students gang raped 10th class student in school premises for seven months | लज्जास्पद! अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकांसह 18 जणांकडून 7 महिन्यांपासून बलात्कार

लज्जास्पद! अल्पवयीन विद्यार्थिनीवर मुख्याध्यापकांसह 18 जणांकडून 7 महिन्यांपासून बलात्कार

पाटणा : बिहारमधील सारण येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका खासगी शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीनं मुख्याध्यापक, दोन शिक्षक आणि पंधरा विद्यार्थ्यांवर बलात्काराचा आरोप केला आहे. गेल्या सात महिन्यांपासून हा सर्व प्रकार सुरू होता, अशी तक्रार विद्यार्थिनीनं पोलिसांकडे दिली आहे. यानंतर सारण पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. यामध्ये मुख्याध्यापक, एक शिक्षक आणि दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

डिसेंबर महिन्यापासून आपल्यासोबत हा घृणास्पद प्रकार घडत होता, अशी माहिती पीडित विद्यार्थिनीनं पोलिसांना दिली. पीडितेचे वडील गेल्या काही महिन्यांपासून तुरुंगात होते. त्यामुळे तिने इतके दिवस या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली नाही. पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये 18 जणांच्या नावांचा समावेश आहे. 'डिसेंबरमध्ये काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या स्वच्छतागृहात माझ्यावर सामूहिक बलात्कार केला. त्यांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडीओदेखील तयार केला. तेव्हापासून ते विद्यार्थी मला व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल करायचे. त्यानंतर अनेकदा त्यांनी माझ्यावर सामूहिक बलात्कार केला,' अशी माहिती पीडितेनं दिली. 

या घटनेची तक्रार करण्यासाठी मुख्याध्यापकांकडे गेल्याचंही पीडितेनं सांगितलं. 'माझ्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार मी मुख्याध्यापकांना सांगितला. मात्र त्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याऐवजी मुख्याध्यापकांनी दोन शिक्षकांसह माझ्यावर बलात्कार केला,' अशी व्यथा पीडितेनं मांडली. पीडित मुलीनं तक्रारीत 18 जणांची नावं सांगितल्याची माहिती सारणचे एसपी हरकिशोर राय यांनी दिली. 'या प्रकरणी चारजणांना अटक करण्यात आली असून 14 जणांचा शोध सुरू आहे,' असं राय यांनी सांगितलं. 
 

Web Title: in bihar principal two teachers and 15 students gang raped 10th class student in school premises for seven months