धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2021 02:27 PM2021-08-07T14:27:26+5:302021-08-07T14:28:55+5:30

पुजाऱ्याने मंदिरात आलेल्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. यावेळी येथील कुणी तरी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Bihar priest beaten up woman who came to worship in temple video viral | धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

धक्कादायक! मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेला पुजाऱ्याची केस पकडून मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Next

पाटणा - बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका पुजाऱ्याने पूजेसाठी मंदिरात आलेल्या महिलेला केस पकडून मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओही सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. यानंतर आता मंदिर प्रशासनाने पुजाऱ्यावर कारवाई केली असून प्रकरणी चौकशी केली जाईल असे म्हटले आहे. तसेच चौकशी होईपर्यंत संबंधित पुजाऱ्याला मंदिराच्या कामापासून दूर केले आहे.

ही घटना दरभंगाच्या राज परिसरातील श्यामा माई मंदिराच्या पायऱ्यांवर घडली. येथे पुजाऱ्याने मंदिरात आलेल्या महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. यावेळी येथील कुणी तरी या घटनेचा व्हिडिओ तयार केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

या घटनेसंदर्भात संबंधित महिलेकडून अद्याप कसल्याही प्रकारची तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. या महिलेची ओळखही अद्याप पटू शकलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे सर्वसामान्यांसाठी मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मात्र, ही महिला दरवाजा उघडण्याची मागणी करत, मंदिरात जाऊन श्यामा माईची पूजा करण्याचा हट्ट करत होती. यामुळे संतप्त झालेल्या पुजाऱ्याने महिलेचे केस पकडून तिला मारहाण केली. 

संबंधित घटनेच्या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत मंदिर कमिटीचे सदस्य चौधरी हेमचंद्र रॉय यांनी म्हटले आहे की, 'कुठल्याही महिलेसोबत असे वर्तन करणे योग्य नाही. संबंधित पुजाऱ्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.'

Read in English

Web Title: Bihar priest beaten up woman who came to worship in temple video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.