शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रशांत किशोर यांची सुप्रीम कोर्टात धाव; बिहारमध्ये नव्याने निवडणुका घेण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 12:47 IST

ऐन मतदानाच्या तोंडावर महिलांना 10 हजार रुपये देण्यावर पीकेंचा आक्षेप!

Bihar Politics: निवडणूक रणनीतीकार आणि जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी बिहार विधानसभा निवडणुकीला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. या याचिकेत निवडणुकीपूर्वी महिलांना 10,000 रुपये थेट हस्तांतरित करण्याच्या निर्णयावर गंभीर आक्षेप नोंदवण्यात आला आहे.

पीकेंच्या पक्षाचा दावा आहे की, आदर्श आचारसंहिता लागू असताना राज्य सरकारकडून करण्यात आलेले हे थेट आर्थिक हस्तांतरण निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकणारे आणि बेकायदेशीर आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीतील कथित गैरप्रकारांना आव्हान देत नव्याने निवडणूक घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रियेवर परिणाम झाल्याचा दावा

जन सूरज पक्षाने याचिकेत नमूद केले आहे की, निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात महिलांच्या खात्यात रक्कम जमा करणे, हे मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न असून, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता बाधित झाली आहे. पक्षाने हा प्रकार लोकशाही मूल्यांच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे.

सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर उद्या होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने याचिका सुनावणीसाठी स्वीकारण्याची तयारी दर्शवली असून, त्यामुळे या प्रकरणाला राष्ट्रीय पातळीवर महत्त्व प्राप्त झाले आहे.

राजकीय वर्तुळात खळबळ

बिहार निवडणुकांशी संबंधित हा खटला न्यायालयात गेल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विशेषतः निवडणुकीदरम्यान जाहीर होणाऱ्या आर्थिक योजनांची वैधता आणि त्यांचा मतदारांवर होणारा परिणाम यावर आता न्यायालयीन भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prashant Kishor Challenges Bihar Election, Seeks Fresh Polls in Supreme Court

Web Summary : Prashant Kishor petitions Supreme Court, challenging Bihar's election. He alleges illegal money transfer influenced voters, demanding a fresh election. Hearing scheduled tomorrow.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Prashant Kishoreप्रशांत किशोरBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय