निष्काळजीपणाचा कळस; कानाचा उपचार करायला गेलेल्या तरुणीचा कापावा लागला हात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2022 14:39 IST2022-09-02T14:34:28+5:302022-09-02T14:39:55+5:30
हात कापल्यामुळे तरुणीचे लग्न तुटले, राजकीय दबावामुळे पोलिसांनीही तक्रार दाखल करण्यास नकार दिला.

निष्काळजीपणाचा कळस; कानाचा उपचार करायला गेलेल्या तरुणीचा कापावा लागला हात
पाटणा: बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी पाटणा येथील महावीर आरोग्य संस्थेत कानाचा इलाज करण्यासाठी गेलेल्या मुलीचा हात कापल्याचा प्रकार समोर आला आहे. एवढंच नाही तर निष्काळजीपणाची शिकार झालेल्या मुलीची एफआयआर नोंदवण्यास पोलिसांनीही नकार दिला. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. टीव्ही9 हिंदीने तरुणीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.
यह घटना झकझौर देने वाली है-#patna के महावीर आरोग्य संस्थान में कान का इलाज कराने गई 20 साल की लड़की को गलत इंजेक्शन लगाया गया. बाद में लड़की का हाथ ही काटना पड़ गया.पुलिस ने लापरवाही का शिकार हुई पीड़िता की FIR भी दर्ज करने से इनकार कर दिया. नवंबर में लड़की की शादी होने वाली थी pic.twitter.com/tWK2Jp0dOi
— Kumar Abhishek (@active_abhi) September 2, 2022
रेखा असे पीडितेचे नाव असून ती मूळची शेओहरची आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 11 जुलै रोजी पीडित रेखा कुमारीच्या कानाचे ऑपरेशन झाले होते. मात्र ऑपरेशननंतरही रेखाच्या कानात दुखत होते. यानंतर रेखा पाटण्यातील महावीर आरोग्य संस्थेत कानाच्या उपचारासाठी गेली, मात्र एका छोट्याशा निष्काळजीपणाने रेखाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. रेखाला नर्सने रक्तवाहिनीऐवजी धमनीत इंजेक्शन दिले, त्यामुळे हातामध्ये संसर्ग पसरला आणि हात हळूहळू सडू लागला.
यावर्षी नोव्हेंबरमध्ये रेखाचे लग्न होणार होते
रेखाने याबाबत डॉक्टर आणि परिचारिकांना अनेकदा सांगितले, पण कोणीही लक्ष दिले नाही. रेखाने डॉक्टर आणि नर्सला वारंवार तिच्या हातावर उपचार करण्यास सांगितले तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटलमधून हाकलून देण्याची धमकी दिली. अखेर तिचा हात कोपऱ्यापासून कापावा लागला. रेखाचे नोव्हेंबरमध्ये लग्न होणार होते, मात्र आता हात कापल्यामुळे तिचे लग्न तुटले. राजकीय दबावामुळे एफआयआर नोंदवला जात नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला
या घटनेनंतर रेखाचे कुटुंबीय कंकरबाग पोलिस ठाण्यात डॉक्टरांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी गेले असता, तेथील पोलिसांनी एफआयआर नोंदवण्यास नकार दिला. हा अहवाल लिहिपर्यंत पीडितेचा एफआयआर नोंदवण्यात आला नव्हता. आता ती न्यायाची मागणी करत आहे.