शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Bihar: बिहारमध्ये एनडीएचा अनोखा विक्रम; २५ पैकी २४ मंत्री विजयी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 13:06 IST

बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जोरदार मुसंडी मारली.

लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) जोरदार मुसंडी मारत विरोधी पक्षांच्या महाआघाडीला चारी मुंड्या चीत केले. एनडीएने केवळ तीन-चतुर्थांश जागा जिंकल्या नाही तर या निवडणुकीत नशीब आजमावणाऱ्या जवळपास सर्व मंत्र्यांना पुन्हा निवडून आणण्याचा अनोखा विक्रम नोंदवला आहे. 

या निवडणुकीत भाजप व संयुक्त जनता दलाने आपल्या २५ मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. केवळ जेडीयूच्या एका मंत्र्याचा अपवाद वगळता सर्व २४ मंत्री निवडून आले आहेत. भाजपचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व विजय कुमार सिन्हा हे दोघे अनुक्रमे तारापूर व लखीसराय या मतदारसंघांतून विजयी झाले. मुख्यमंत्री नितीश कुमार हे विधान परिषदेचे सदस्य असल्याने त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. भाजपने आपल्या १५ मंत्र्यांना पुन्हा विधानसभेचे तिकीट दिले होते. हे मंत्री पुन्हा विजयी झाले आहेत. 

भाजपचे अनुभवी नेते व कृषिमंत्री प्रेम कुमार हे सलग आठव्यांदा गया टाऊन या मतदारसंघातून विजयी झाले. त्यांनी जेडीयूचे कॅबिनेटमधील सहकारी बिजेंद्र यादव (सुपौल) यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.  मंत्री संजय सरावगी व नितीन नबीन हे दोघे अनुक्रमे दरभंगा व बंकीपूर या मतदारसंघांतून सलग पाचवेळा विजयी झाले आहेत. 

बिहारच्या नवीन सरकारसोबत काम करण्यास इच्छुक : चिराग पासवान

- बिहारमधील नवीन सरकारमध्ये सहभागी होण्यास लोक जनशक्ती पक्ष(रामविलास) इच्छुक असल्याचे शनिवारी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी स्पष्ट केले. संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदी राहावे, ही माझी वैयक्तिक इच्छा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

- राज्यात एनडीएला मिळालेल्या यशाबद्दल नितीश कुमार यांचे लोजप (रामविलास)च्या प्रतिनिधी मंडळाने अभिनंदन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना पासवान यांनी संबंधित विधान केले. त्यावेळी नवीन सरकार स्थापनेसंदर्भात त्यांच्यासोबत चर्चा केल्याचे पासवान म्हणाले. यावेळी पक्षाला पुरेसे प्रतिनिधित्व मिळाले आहे. 

- त्यामुळे सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक आहोत, असेही पासवान म्हणाले. मी नितीश कुमार यांचा कट्टर विरोधक आहे, हा विरोधकांनी केलेला खोटा प्रचार असल्याचा दावा करत पासवान यांनी राजदला लक्ष्य केले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar NDA achieves rare feat: 24 of 25 ministers win!

Web Summary : Bihar's NDA secured a victory, with 24 of 25 ministers winning. BJP's Samrat Choudhary and Vijay Kumar Sinha triumphed. Chirag Paswan expressed willingness to join the new government, supporting Nitish Kumar as Chief Minister, dismissing opposition claims.
टॅग्स :BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारchirag paswanचिराग पासवानPoliticsराजकारण