Bihar: बिहारमध्ये ४० आमदारांचे सदस्यत्व येणार धोक्यात, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 02:49 PM2022-06-25T14:49:47+5:302022-06-25T14:50:04+5:30

Bihar: बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या २३४ आमदारांपैकी ४० आमदारांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिली आहे. यातील १० आमदार तर असे आहेत की, त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलात खूप मोठी तफावत आढळली आहे.

Bihar: Membership of 40 MLAs in Bihar is in danger, wrong information in election affidavit | Bihar: बिहारमध्ये ४० आमदारांचे सदस्यत्व येणार धोक्यात, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती

Bihar: बिहारमध्ये ४० आमदारांचे सदस्यत्व येणार धोक्यात, निवडणूक शपथपत्रात चुकीची माहिती

Next

- एस. पी. सिन्हा
 पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीत विजय मिळविणाऱ्या २३४ आमदारांपैकी ४० आमदारांनी निवडणुकीच्या शपथपत्रात चुकीची माहिती दिली आहे. यातील १० आमदार तर असे आहेत की, त्यांच्या मालमत्तेच्या तपशिलात खूप मोठी तफावत आढळली आहे. काहींची संपत्ती शपथपत्रापेक्षा १० ते २० कोटींपेक्षा अधिक आढळली आहे. आयकर विभागाच्या तपासणीत ही बाब पुढे आली असून, आता हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आले आहे. 
या आमदारांमध्ये जदयू, भाजप, राजद, हम, काँग्रेससह अनेक पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. यात बाहुबली आमदार अनंत सिंह यांच्यापासून माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या नावाचा समावेश आहे. 

पुढे काय होणार? 
चुकीची माहिती देणाऱ्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द केले जाऊ शकते. याबद्दल त्यांना दंडही ठोठावला जाऊ शकतो. त्याचबरोबर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. केंद्रीय निवडणूक आयोग कशा प्रकारची कारवाई करते, यावर सर्व अवलंबून आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.  या आमदारांनी आपली प्रत्यक्षातील संपत्ती शपथपत्रात कमी करून दाखवली आहे. याचा अर्थ त्यांनी माहिती लपविली, असा काढला जातो.

Web Title: Bihar: Membership of 40 MLAs in Bihar is in danger, wrong information in election affidavit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.