बिहारच्या हाजीपूरमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2018 17:58 IST2018-12-20T17:56:56+5:302018-12-20T17:58:06+5:30
भाजपा नेता गुंजन खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना हाजीपूर येथे घडली आहे.

बिहारच्या हाजीपूरमध्ये भाजपा नेत्याची गोळ्या घालून हत्या
पाटणा - भाजपा नेता गुंजन खेमका यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याची घटना हाजीपूर येथे घडली आहे. या हत्याकांडमागील सूत्रधार कोण आहे?, याची माहिती अद्यापपर्यंत स्पष्ट झालेली नाही. दरम्यान, या घटनेत खेमका यांचा ड्रायव्हरदेखील जखमी झाला आहे.
हाजीपूरच्या औद्योगिक क्षेत्र परिसरात खेमका यांचा कारखाना आहे. या कारखान्याबाहेरच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात खेमका यांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यामध्ये गुंजन यांच्या वाहन चालकालाही गोळी लागली. यानंतर त्यांना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
दरम्यान, गुंजन यांच्यावर हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. मात्र अद्यापपर्यंत हल्लेखोरांबाबत कोणताही पुरावा मिळालेला नाही.