नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2024 02:12 PM2024-02-12T14:12:39+5:302024-02-12T14:13:59+5:30

Bihar Floor Test: महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांची बिहार विधानसभेत सुरू असलेल्या बहुमत चाचणीमध्ये कसोटी लागणार आहे. दरम्यान, या बहुमत चाचणीपूर्वी नितीश कुमार यांनी सभागृहातील पहिली लढाई जिंकली आहे.

Bihar Floor Test: Nitish Kumar wins first battle, ousts Bihar Assembly Speaker | नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले 

नितीश कुमारांनी पहिली लढाई जिंकली, बिहार विधानसभेच्या अध्यक्षांना पदावरून हटवले 

महाआघाडीची साथ सोडून पुन्हा एनडीएसोबत आलेल्या नितीश कुमार यांची बिहार विधानसभेत सुरू असलेल्या बहुमत चाचणीमध्ये कसोटी लागणार आहे. दरम्यान, या बहुमत चाचणीपूर्वी नितीश कुमार यांनी सभागृहातील पहिली लढाई जिंकली आहे. सत्ताधारी पक्षाने विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्याविरोधात आणलेला प्रस्ताव बहुमताने पारित झाला असून, त्यानंतर अवध बिहारी चौधरी यांना पदावरून हटवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांना हटवण्याबाबतच्या या प्रस्तावाच्या बाजूने १२५ तर विरोधात ११२ मतं पडली आहेत.

आज सुरू असलेल्या बहुमत चाचणीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये कालपासूनच मोठ्या घडामोडी चालू होत्या. दोन्ही पक्षांकडून आपापल्या विजयाचे दावे करण्यात येत होते. दरम्यान, बहुमत चाचणीवेळी अध्यक्षांकडून कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी सत्ताधारी एनडीएने प्रथम विधानसभा अध्यक्षांना पदावरून हटवण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला. हा प्रस्तावर सुरुवातीला आवाजी मतदानाद्वारे पारित करण्यात आला. त्यानंतर या प्रस्तावावर मतविभाजन घेण्यात आले. त्यामध्ये विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांना हटवण्याच्या बाजूने १२५ तर विरोधामध्ये ११२ मते पडली.

विधानसभा अध्यक्षांना हटवण्यासाठी घेण्यात आलेल्या मतदानामध्ये २४३ सदस्य असलेल्या बिहार विधानसभेमध्ये १२५ सदस्य सोबत असल्याचे समोर आल्याने नितीश कुमार यांना बहुमत चाचणीपूर्वीच मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच संभाव्य फुटाफुटीची चर्चा सुरू असताना आरजेडीमधील तीन आमदारांनी पारडे बदलून जेडीयूच्या गोटात प्रवेश केल्याने महाआघाडीला मोठा धक्का बसला आहे. 

Web Title: Bihar Floor Test: Nitish Kumar wins first battle, ousts Bihar Assembly Speaker

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.