नातेवाईकावर अंत्यसंस्कार केल्यानंतर अंघोळीसाठी नदीत उतरलेल्या बाप-लेकासह तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सोन नदीत शनिवारी घडली. हे सर्वजण काजीपूर गावचे रहिवासी आहेत.ग्रामस्थ बाधित कुटुंबांना भरपाई आणि मदतीची मागणी करत आहेत.
नागेश्वर शर्मा, रंजन शर्मा आणि रितेश शर्मा अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे तिघेही गावातील उदय शर्मा यांच्या आईच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी नवराता घाटावर गेले. अंत्यसंस्कारानंतर तिघेही नदीत आंघोळ करायला गेले. परंतु, पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही वाहून गेले, अशी माहिती रोहतासचे एसपी रौशन कुमार यांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ जावानांनी आणि स्थानिक गोताखोरांनी बचाव कार्याला सुरुवात केली. एकाच वेळी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने गावात दुःखाचे वातावरण आहे. ग्रामस्थ बाधित कुटुंबांना भरपाई आणि मदतीची मागणी करत आहेत.
याआधी २७ एप्रिल रोजी नौहट्टा पोलीस स्टेशन हद्दीत बांदू गावाजवळ सोन नदीत आंघोळ करताना पाच मुले बुडाल्याची घटना. या घटनेत तीन मुली आणि एका मुलाचा मृत्यू झाला. तर, एका मुलीला वाचवण्यात यश आले. ही सर्व मुली नातेवाईकांच्या घरी गृहप्रवेश समासंभात सहभागी होण्यासाठी गेले होते. समारंभादरम्यान ते सोन नदीत आंघोळ करण्यासाठी गेले असताना हा धक्कादायक प्रकार घडला.