Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 16:31 IST2025-11-14T16:29:02+5:302025-11-14T16:31:13+5:30

AIMIM Bihar Election Result 2025: बिहार विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पण, या निवडणुकीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमची कामगिरी काँग्रेसपेक्षा सरस राहिली आहे. 

Bihar Election Results: Owaisi's AIMIM is stronger than Congress; How is it performing in Bihar? | Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?

Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?

AIMIM Bihar Election Result: हरयाणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि आता बिहार... लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी राहिलेल्या काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे. सलग चौथ्या मोठ्या निवडणुकीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला दोन जागांवरच थांबली आहे. या जागांवर काँग्रेसने आघाडी घेतलेली. उलट असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमने बिहारमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एआयएमआय सहा जागांवर आघाडीवर असून, पाच जांगावर मोठं मताधिक्य घेतलेलं आहे. 

बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला आपली कामगिरी उंचावता आलेली नाही. दुपारी चार वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार काँग्रेस किशनगंज आणि मनिहारी या दोन मतदारसंघातच आघाडीवर होती. काँग्रेसपेक्षा असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमची कामगिरी चांगली राहिली आहे. 

एमआयएम कोणत्या मतदारसंघात आघाडीवर?

एमआयएमने पाच मतदारसंघात आघाडी घेतली असून, पाचही मतदारसंघातील उमेदवारांच मताधिक्य जास्त आहे. जोकिहाटमध्ये २७ हजार, बहादूरगंजमध्ये ११ हजार, कोचधमणमध्ये २३ हजार, अमौरमध्ये ३८ हजार, बैसीमध्ये १२ हजारांनी एमआयएमचे उमेदवार पुढे आहेत. 

भाजपची सर्वात मोठा पक्ष म्हणून मुसंडी 

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. चार वाजेपर्यंत झालेल्या मतमोजणीनुसार भाजपने तीन जागांवर विजय मिळवला तर ८९ जागांवर आघाडी घेतलेली आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेला नितीश कुमारांचा जदयू दुसऱ्या क्रमांकावर आहे. जदयूने ६ जागा जिंकल्या असून, ७७ जागांवर आघाडी घेतलेली आहे. तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असलेल्या राष्ट्रीय जनता दलाचा मोठा पराभव झाला आहे. जनता दल २७ जागांवर आघाडीवर आहे. 

Web Title: Bihar Election Results: Owaisi's AIMIM is stronger than Congress; How is it performing in Bihar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.