शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
2
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
3
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
4
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
5
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
6
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
7
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
8
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
9
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
10
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
11
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
12
बिहार विजयाच्या पडद्यामागे विनोद तावडेंचा हात; भाजपा मोठे बक्षीस देण्याची शक्यता...
13
मुझम्मिलचा जवळचा सहकारी मुस्तकीम सापडला; या कामासाठी ९ नोव्हेंबरला दिल्लीला आला होता, मोठा खुलासा
14
परप्रांतीय पाणीपुरी विक्रेत्याला ३ लाखात विकला BMC चा फुटपाथ; शिंदेसेनेच्या नेत्याचा अजब प्रताप
15
भारतीय हवाई दलाचे विमान तांबरमजवळ कोसळले; कोर्ट ऑफ इन्क्वायरीचा आदेश
16
ऐतिहासिक निर्णय! सरकारी, खासगी क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांसाठी दरमहा १ दिवस 'भरपगारी रजा' मिळणार...
17
बापरे! कूल वाटणारं कव्हर ठरू शकतं रिस्की; अचानक होईल स्मार्टफोनचा स्फोट, वेळीच व्हा सावध
18
Bihar Election Results: ओवेसींची एमआयएम काँग्रेसपेक्षा ठरली भारी; बिहारमध्ये कामगिरी कशी?
19
...तर मी संन्यास घेईन; प्रशांत किशोरांनी केलेली घोषणा, आता आपले वचन पाळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

कॅश-कट्टा डावानं तेजस्वींचं स्वप्न उधळलं; पण विजयानंतरही भाजपला मोठं टेंशन! नीतीश कुमारांशिवाय सरकार बनू शकतं, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 15:35 IST

भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीच्या आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, राज्याचे राजकीय समीकरण जवळपास स्पष्ट झाले आहे. येथे एनडीए पुन्हा एकदा सत्तेवर येत असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. महाअघाडीचे तर 40 जागांपर्यंत पोहोचणेही अवघड दिसत आहे. भाजपने 101 जागा लढल्या होत्या, त्यांपैकी जवळपास 95 जागांवर आघाडी मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनताना दिसत आहे. तर जेडीयू 84 जागांवर आघाडीवर आहे. तर दुसऱ्या बाजूला राजदची 30 जागांपर्यंत पोहचतानाही दमछाक होताना दिसत आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणूक आचारसंहिता लागल्यानंतरही, नीतीश सरकारने राज्यातील 1.7 कोटी महिलांच्या खात्यात 10000 रुपये जमा करण्याच्या योजनेचा घेतलेला निर्णय, हा एनडीएसाठी खास टर्निंग पॉइंट ठरला. या कॅश योजनेमुळे महिलांचे मतदान पुरुषांच्या तुलनेत 8.15 टक्क्यांनी अधिक झाले. यानिवडणुकीत 62.98% पुरुषांचे तर 71.78% महिलांचे मतदान नोंदवले गेले. बिहारमध्ये एकूण 3.51 कोटी महिला मतदार आहे. त्यांच्या एकमुखी पाठिंब्याचा भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे.

पंतप्रधान मोदींचा जोरदार प्रचार -पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभांमध्ये ‘कट्टा आणि खंडणी’ यांसारखे शब्द सातत्याने वापरले गेले. राजद पुन्हा सत्तेवर आला तर पुन्हा तत्कालीन परिस्थिती निर्माण होईल, असा संदेश मतदारांमध्ये रूजवला गेला. यामुळे मतदारांतील 'जंगलराज'च्या आठवणी ताज्या झाल्या. याशिवाय, दुसऱ्याबाजूला तेजस्वी यादव यांनी महिलांना दर महिन्याला 2500 रुपये देण्याचे आश्वासन दिले, मात्र नीतीश कुमार यांनी केलेले काम आणि दिलेला खात्रीशीर लाभ यावर महिलांनी अधिक विश्वास ठेवला. एक्झिट पोल्सचे निष्कर्षही याचीच पुष्टी करणारे होते.

भाजप सरकार स्थापन करू शकतो पण एक टेन्शन...! -महत्वाचे म्हणजे, एनडीएच्या विजयानंतरही भाजपसमोर एक नवा पेच आहेच. हा पेच आहे मुख्यमंत्रीपदाचा. आतापर्यंत आलेल्या निकालानुसार, भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसरा, भाजप 95, एलजेपीआर 25, हम 5 आणि आरएलएम 4 अशा एकूण 129 जागांवर आघाडीवर आहेत, तर बहुमतासाठी केवळ 122 जागांचीच आवश्यकता आहे. याशिवाय जेडीयू 83 जागांवर आघाडीवर आहे. या जागा निकालात बदलल्या तर भाजप नीतीश कुमारांच्या जेडीयू शिवायही सत्ता स्थापन करू शकतो, राज्यात बहुमत सिद्ध करू शकतो आणि आपला मुख्यमंत्री बनवू शकतो. मात्र असे असले तरी, भाजपला पुढील राजकीय समीकरणांचे भान राखतच पावले टाकावी लागणार आहेत. कारण, राजनीतिक जानकारांच्या मते, भाजपने असे केल्यास, केंद्र सरकारवरही परिणाम होऊ शकतो. याहूनही मोठी गोष्ट म्हणजे, भाजपा विरोधात चुकीचा नरेटिव सेट होऊ शकतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar Election: NDA victory, BJP's dilemma despite win, future uncertainties.

Web Summary : NDA secures Bihar victory, BJP emerges largest party. Women voters favored NDA's schemes. BJP can form government without JDU but faces political challenges and potential national repercussions.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Electionनिवडणूक 2024Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपाNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी