Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 14:57 IST2025-10-16T14:56:14+5:302025-10-16T14:57:03+5:30
एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तिकीट नाकारल्यानंतर एलजेपी नेते अभय सिंह ढसाढसा रडले.

Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
भाजपा, जेडीयू आणि बिहारमधील लहान पक्षांनी उमेदवारांची घोषणा केल्यानंतर काही उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये तिकीट नाकारल्यानंतर एलजेपी नेते अभय सिंह ढसाढसा रडले. मोरवा सीट जेडीयूकडे गेल्याने अभय सिंह यांची निवडणूक लढण्याची आशा धुळीस मिळाली. त्यांनी अश्रू अनावर झाले.
समस्तीपूर जिल्ह्यातील मोरवा विधानसभा मतदारसंघातील एलजेपी (रामविलास) नेते अभय कुमार सिंह यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते खूप रडताना दिसत आहेत आणि तिकीट वाटपात पैशाचे व्यवहार झाल्याचा आरोप करत आहेत. व्हिडिओमध्ये अभय सिंह असं म्हणत आहेत की, "माझ्यापेक्षा कोणीतरी जास्त पैसे दिले, म्हणून त्याला तिकीट मिळालं. मी आता राजकारणातून संन्यास घेत आहे." हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
टिकट न मिलने पर फूट-फूट कर रोए LJP(R) नेता अभय सिंह, मोरवा सीट JDU को जाने पर बोले– 'पैसे वालों को मिला टिकट, अब राजनीति से संन्यास'
— Prachi Shekhawat 🇮🇳 (@iprachi_singh) October 16, 2025
pic.twitter.com/8KDhDEPirq
अभय कुमार सिंह हे २०२० च्या विधानसभा निवडणुकीत एलजेपी (रामविलास) चे उमेदवार होते आणि यावेळीही ते मोरवा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक होते. जेव्हा चिराग पासवान यांच्या पक्षाला एनडीए आघाडीअंतर्गत २९ जागा देण्यात आल्या तेव्हा मोरवा आणि रोसेरा जागा देखील त्यांच्या वाट्याला आल्या. नितीश कुमार यांच्या नाराजीनंतर, ही जागा जेडीयूकडे गेली, जिथे माजी आमदार विद्यासागर निषाद यांना उमेदवारी देण्यात आली.
या निर्णयावर नाराज अभय सिंह यांनी फेसबुक लाईव्हद्वारे आपली नाराजी व्यक्त केली आणि राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. व्हिडिओमध्ये ते भावुक झालेले दिसत आहेत आणि त्यांच्या समर्थकांना राजकारण सोडण्यामागचं कारण सांगितलं. अभय सिंह यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन बंद होता. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.