"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 20:55 IST2025-11-04T20:51:39+5:302025-11-04T20:55:15+5:30
राजद नेते तेजस्वी यादव यांचा पलटवार, योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा...!

"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिहार निवडणुकीच्या प्रचारादरम्यान “टप्पू-पप्पू-अप्पू” असे विधान केले होते. हे विधान त्यांनी तेजस्वी यादव, राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांना उद्देशून केले होते. यावर आता राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी पलटवार केला आहे. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
तेजस्वी यांना विचारण्यात आले की, मुख्यमंत्री योगी आपल्याला टप्पू म्हणतात, राहुल गांधींना पप्पू आणि अखिलेश यादव यांना अप्पू म्हणतात. अखिलेश यादवही पलटवार करत, पंतप्रधानांना गप्पू आणणि भाजपच्या इतर नेत्यांना चंपू म्हणत आहेत? यासंदर्भात एबीपी न्यूजसोबत बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, “योगी आदित्यनाथ हे असे मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम स्वतःवरील गंभीर गुन्हे मागे घेण्याचे काम केले. आपण सर्वांनी भाषेचे भान ठेवायला हे. राज्याचे मुख्यमंत्री किंवा देशाचे पंतप्रधान अशी भाषा वापरत असतील तर, त्यांचे काय विचार आहेत हे आपण समजू शकता.”
तेजस्वी पुढे म्हणाले, "भाजपचे लोक ज्या पद्धतीची भाषा वापरतात, अत्यंत वाइट वाटते. असे लोक लोकप्रतिनिधी आहे. संवेधानिक पदावर आहेत. आम्ही अशा भाषेचे समर्थन करत नाही."
लालू प्रसाद यादव यांच्यासंदर्भात बोलताना तेजस्वी म्हणाले, "लालू यादव यांनी, जी भाकरी अनेक शतकांपासून जळत होती, ती केवळ पलटली. त्यांनी दलितांना खुर्चीवर बसवले, याचा यांना त्रास होत आहे.”
तेजस्वींनी पुढे सांगितले की, “लालूजींच्या काळात बीपीएससीमार्फत शिक्षक भरती झाली. आमच्या सरकारनेही तेच पारदर्शक पद्धतीने केले.” केंद्रावर टीका करताना ते म्हणाले, बिहार-झारखंड विभाजनानंतर राज्याचे उद्योग आणि खनिज संपत्तीही झारखंडकडे गेली. अटल बिहारी वाजपेयी सरकारने ज्या ‘स्पेशल पॅकेज’चे आश्वासन दिले होते, ते आजवर मिळाले नाही."