मराठमोळे 'सुपर कॉप' शिवदीप लांडे बिहारच्या रणांगणात; 'या' मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2025 16:09 IST2025-10-16T16:07:50+5:302025-10-16T16:09:36+5:30
Bihar Election 2025: माजी IPS अधिकारी शिवदीप लांडे बिहार विधानसभा निवडणूक लढवत आहेत.

मराठमोळे 'सुपर कॉप' शिवदीप लांडे बिहारच्या रणांगणात; 'या' मतदारसंघातून भरला उमेदवारी अर्ज
Bihar Election 2025:बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर एक-एक करत विविध पक्षाचे नेते मोठे शक्तीप्रदर्शन करत आपापला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. अशातच, पोलिस सेवेतून निवृत्ती घेऊन राजकारणात उतरलेले मराठमोळे IPS अधिकारी शिवदीप लांडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ते मुंगेर आणि अररिया, या दोन मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत.
शिपदीप लांडे यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये स्वतःला “बिहारचा मुलगा आणि सेवक” म्हटले, तसेच बिहारच्या नागरिकांना मतदारनाचे आवाहन केले. दरम्यान, आज(दि.16) सकाळी ९ वाजता आपल्या निवडणूक मोहिमेची सुरुवात केल. जुबली वेल चौकातून भव्य बाइक रॅली काढल्यानंतर, मुंगेर सदर अनुमंडल कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला.
— Shivdeep Wamanrao Lande (@ShivdeepLande) October 16, 2025
जनतेच्या मनात ‘सिंघम’ प्रतिमा
मूळ महाराष्ट्रातील अकोल्याचे शिवदीप लांडे हे 2006 बॅचचे बिहार कॅडरमधील सर्वात लोकप्रिय IPS अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी पटना, अररिया, पूर्णिया आणि मुंगेर येथे कार्यरत असताना गुन्हेगारी, माफिया आणि भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर कारवाई केली होती. त्यांच्या या धाडसी कामगिरीमुळे त्यांना ‘सिंघम’, ‘रॉबिन हुड’ 'दबंग' अशा उपाध्या मिळाल्या. त्यांनी गरीब आणि दुर्बलांसाठी नेहमी तत्पर राहून लोकांच्या मनात वेगळी प्रतिमा निर्माण केली. पोलिस सेवेत राहून लोकांची सेवा करणाऱ्या शिवदीप लांडेंना मतदार पाठिंबा देतात का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.