बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यापूर्वी जनता दल (युनायटेड) ने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक नवे पोस्टर शेअर करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. या पोस्टरमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र दिसत आहेत. तसेच, “१० हजार परत करायचे नाहीत, प्रत्येक घरातील एक महिला उद्योजक बनणार." असे लिहिले आहे. याच बरोबर, “‘नीतीश जी ने है ठाना, NDA को वोट देना है निभाना,” असे घोषवाक्यही लिहिले आहे.
विरोधकांनी सातत्याने आरोप केला होता की ‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजने’अंतर्गत महिलांना दिलेले १० हजार रुपये निवडणुका संपल्यानंतर परत घेतले जातील. मात्र, या पोस्टरद्वारे नितीश कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, ही रक्कम “नॉन-रिफंडेबल” आहे, म्हणजेच ती महिलांना परत करायची नाही. ही रक्कम कर्ज नसून महिलांना आत्मनिर्भर बनविण्याचा ठोस प्रयत्न आहे.
एनडीए सरकारने २६ सप्टेंबर २०२५ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील प्रत्येक कुटुंबातील एका महिलेला स्वरोजगाराची संधी देण्यात येणार आहेत. या योजनेत आतापर्यंत १.५१ कोटी महिलांच्या खात्यात थेट १० हजार रुपयांपर्यंतची रक्कम जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांनाही लवकरच लाभ दिला जाणार आहे. याशिवाय, ज्या स्वतःचा व्यवसाय यशस्वीपणे उभारतील, त्यांना पुढील टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीपूर्वी जेडीयूचा हा निर्णय महिलांच्या मतदारवर्गावर थेट परिणाम करणारा ठरणार आहे. ग्रामीण भागात या योजनेला आधीपासूनच सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, महिलांचा हा मतदारवर्ग आगामी निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Web Summary : Bihar's NDA government, led by Nitish Kumar, announced that women will not have to repay ₹10,000 given under a self-employment scheme. The scheme aims to empower women entrepreneurs, and ₹1.51 crore has already been disbursed. This is expected to influence women voters.
Web Summary : बिहार की एनडीए सरकार, नीतीश कुमार के नेतृत्व में, ने घोषणा की कि महिलाओं को स्वरोजगार योजना के तहत दिए गए ₹10,000 वापस नहीं करने होंगे। योजना का उद्देश्य महिला उद्यमियों को सशक्त बनाना है, और ₹1.51 करोड़ पहले ही वितरित किए जा चुके हैं। इससे महिला मतदाताओं को प्रभावित करने की उम्मीद है।