Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 19:32 IST2025-11-14T19:29:23+5:302025-11-14T19:32:36+5:30
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. २०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत तेजस्वी यादवांच्या पक्षाला चांगले यश मिळाले होते. पण या निवडणुकीत त्यांना मोठा फटका बसला आहे.

Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
Bihar Election Results 2025: २०२० मध्ये १२२ जागा म्हणजे काठावरच बहुमत एनडीएला मिळाले होते. पण, २०२५ मध्ये नितीश कुमारांच्या नेतृत्वाखाली एनडीएने दणदणीत कामगिरी केली. दुसरीकडे मागच्या निवडणुकीत चांगली कामगिरी केलेल्या राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसला जबर दणका बसला आहे.
बिहारमध्ये २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला १२२ जागा मिळाल्या होत्या. यात सर्वाधिक जागा भाजपच्या होत्या. भाजपचे ७४ आमदार निवडून आले होते. त्यापाठोपाठ जनता दल संयुक्तचे ४३ आमदार निवडून आले होते. हम पक्षाचे चार, लोक जनशक्ती पक्षाचा एकच आमदार जिंकला होता. पण, गेल्यावेळी चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी एनडीएसोबत नव्हती.
भाजप, जनता दल युनायटेडच्या किती जागा वाढल्या?
२०२० मध्ये ७४ जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी ९० जागा जिंकल्या आहेत. भाजपचे १६ आमदार वाढले आहेत. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने तर जबरदस्त कामगिरी केली आहे. गेल्यावेळी ४३ जागा मिळालेल्या जदयूला यावेळी ८४ जागा मिळाल्या आहेत. जदयूच्या ४१ जागा वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वाधिक चांगली कामगिरी जदयूची राहिली आहे.
चिराग पासवान यांनाही एनडीएमध्ये आल्याचा फायदा झाला आहे. गेल्या निवडणुकीत एक जागा जिंकलेल्या चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने यावेळी १९ जागा जिंकल्या आहेत. त्यांनी १८ जागा जास्त जिंकल्या आहेत.
जीतनराम मांझी यांच्या हम पक्षाला गेल्यावेळी ४ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांचे ५ आमदार निवडून आले आहेत.
काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाला किती जागांचा फटका बसला?
२०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय जनता दलाने ७५ जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी त्यांचे खाते २५ जागांवरच बंद झाले आहे. ५० जागांचा फटका तेजस्वी यादवा यांच्या राष्ट्रीय जनता दलाला बसला आहे.
काँग्रेसचे गेल्या निवडणुकीत १९ आमदार निवडून आले होते. पण, यावेळी काँग्रेसलाही त्या कामगिरीमध्ये सुधारणा करता आली नाही. काँग्रेसचे यावेळी ६ आमदार निवडून आले आहेत. १३ जागांचा फटका काँग्रेसला बसला आहे. सीपीआय (मार्क्सवादी डावे) या पक्षाला गेल्या निवडणुकीत १२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांचे खातेही दोन जागांवरच बंद झाले आहे. सीपीआय एमला दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना एकच जागा मिळाली आहे. मागच्या निवडणुकीत महाआघाडीने ११४ जागा जिंकल्या होत्या. यवेळी त्यांचे खाते ३५ जागांवरच बंद झाले आहे.