शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

Bihar Election 2020: बिहारमध्ये भाजपाचा शंखनाद; नड्डा म्हणाले, मोदी-नीतीश यांनी राजकारणाची संस्कृती बदलली 

By श्रीकृष्ण अंकुश | Published: October 11, 2020 5:57 PM

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. (BJP, jp nadda)

ठळक मुद्देनीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - जे. पी. नड्डामोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - जे. पी. नड्डानीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक - जे. पी. नड्डा

पाटणा - भाजपाने रविवारी बिहार विधानसभा निवडणुकीचा शंखनाद केला. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी आज मोक्ष नगरी गया येथील गांधी मैदानातू व्हर्चुअलसोबतच (Virtual) अॅक्चुअल रॅलीलाही संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा करत त्यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.

नड्डा म्हणाले, शेतकरी कायदा आणून पंतप्रधान मोदींनी शेतकऱ्यांची मुक्ती केली आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या कष्टाचा हिशेब घेण्यासाठी जागो-जागी भटकावे लागणार नाही. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही हल्ला चढवला. 70 वर्षांत त्यांनी (काँग्रेस) केवळ जातीच्या आधारावरच राजकारण केले, असेही नड्डा म्हणाले. 

नीतीश कुमारांनी बिहारचे चित्र बदलले - नड्डा म्हणाले, एनडीए सरकारने शिक्षणासाठी अत्यंत उत्तम प्रकारे काम केले आहे. बिहारमध्ये एनडीए काळात 14 वैद्यकीय महाविद्यालये सुरू केली गेली आहेत. आम्ही पाच वर्ष विद्यार्थ्यांसाठी वेगळे बजेट तयार केले. बिहारच्या विकासासाठी भाजपा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. तसेच नितिश कुमारांनी बिहारचे चित्र पालटले आहे. बिहारने अनेक आयएएस आणि आयपीएस दिले आहेत. तसेच विरोधकांवर निशाणा साधताना ते म्हणाले, की निवडणुका या विकासासाठीच होत असतात. 

मोदीनी राजकारणाची संस्कृती बदलली - नड्डा म्हणाले, नरेंद्र मोदी आणि नितीश कुमारांनी भारत आणि बिहारच्या राजकारणाची संस्कृती बदलली. काँग्रेस पक्ष जाती-धर्माच्या नावावर व्होट बँकेचे राजकारण करत होता. मात्र, मोदींनी देशातील राजकारणाची संस्कृती बदलली. तसेच एनडीएने बिहारसाठी अनेक विकासाच्या योजना सुरू केल्या.

नीतीश यांच्या हाती बिहारच्या नेतृत्वाची धुरा देणे आवश्यक -भाजपा अध्यक्ष म्हणाले, देशाचे नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या हातात सुरक्षित आहे. मात्र, बिहारचे नेतृत्व नीतीश यांच्या हातात सुरक्षित ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे बिहारमध्ये एनडीएचे सरकार आणण्यासाठी आपल्या सर्वांना एकत्रितपणे काम करावे लागणार आहे. 

पूर्वीच्या बिहारमध्ये आणि आजच्या बिहारमध्ये मोठा फरक आहे. एनडीएच्या काळात बिहारमध्ये अनेक कामे झाली आहेत, होत आहेत. ही कामे अशीच सुरू ठेवण्यची जबाबदारी आपली आहे. यावेळी नड्डा यांनी एनडीएच्या काळात झालेल्या अनेक कामांची आठवणही जनतेला करून दिली.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNarendra Modiनरेंद्र मोदी