Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 21:13 IST2025-10-26T21:12:15+5:302025-10-26T21:13:55+5:30
Nitish Kumar Bihar Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत नितीश कुमार यांनी आपल्याच पक्षातील तब्बल १६ नेत्यांची हकालपट्टी केली. १६ नेत्यांमध्ये आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांचाही समावेश आहे.

Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
Bihar Election Latest News: मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पक्षाच्या निर्णयाविरोधात भूमिका घेणाऱ्या १६ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. जनता दल (युनाटेड) पक्षाचे चार वेळा आमदार राहिलेल्या गोपाल मंडल आणि इतर माजी मंत्र्यांनाही नितीश कुमारांनी झटका दिला आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची शिस्त मोडल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
नितीश कुमार यांनी रविवारी ज्या नेत्यांची जदयूमधून हकालपट्टी केली आहे, त्यामध्ये गोपालपूरचे आमदार नरेंद्र कुमार उर्फ गोपाल मंडल, माजी मंत्री हिमराज सिंह, माजी आमदार संजीव सिंह, माजी आमदार महेश्वर प्रसाद यादव आणि प्रभात किरण यांचाही समावेश आहे.
२५ ऑक्टोबर रोजी जदयूने माजी आमदारांसह ११ नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. या नेत्यांनी पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी करत एनडीएच्या उमेदवारांविरोधातच अर्ज दाखल केले आहेत.
जदयूमधून हकालपट्टी करण्यात आलेले १६ नेते
शैलेश कुमार, माजी मंत्री
नरेंद्र कुमार नीरज उर्फ गोपाल मंडल, आमदार
हिमराज सिंह, माजी मंत्री
संजीव श्याम सिंह, माजी विधान परिषद आमदार
महेश्वर प्रसाद यादव, माजी आमदार
संजय प्रसाद, माजी आमदार
श्याम बहादूर सिंह , माजी आमदार
रणविजय सिंह, माजी आमदार
सुदर्शन कुमार, माजी आमदार
प्रभात किरण
अमर कुमार सिंह
डॉ. आसमा परवीन
लब कुमार
आशा सुमन
दिव्यांशु भारद्वाज
विवेक शुक्ला