'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 09:58 IST2023-02-18T09:51:15+5:302023-02-18T09:58:56+5:30

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली.

bihar deputy cm tejashwi yadav slams bjp over bbc it survey said bjp wants make india country of nathuram godse | 'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'भाजपला भारताला नथुराम गोडसेचा देशा बनवायचाय; उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा हल्लाबोल

'भाजप केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून भारताला नथुराम गोडसेचे राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे', अशी घणाघाती टीका बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रकाश यांनी केली. बीबीसी कार्यालयातील आयकर सर्वेक्षणावर बोलताना त्यांनी ही टीका केली. असी छापे टाकून केंद्र सरकारला संदेश द्यायचा आहे की जो कोणी सरकारविरोधात बोलेल त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा आरोपही तेजस्वी यादव यांनी केला.

'बीबीसीचे काय झाले ते तुम्हा सर्वांना माहित आहे. गुजरातमध्ये काय झाले हे सर्वांना माहीत आहे. त्यांना महात्मा गांधींचा देश नथुराम गोडसेच्या देशात बदलायचा आहे. ते हिंदु राष्ट्राबद्दल बोलतात पण आपली विविधता हेच आपले सौंदर्य आहे, असंही तेजस्वी यादव म्हणाले. 

अबब...स्कूटीच्या व्हीआयपी क्रमांकासाठी तब्बल १.१२ कोटी, जाणून घ्या नंबर

याअगोदर जेडीयू नेते सुनील सिंह यांनीही भाजपवर टीका केली. ही कारवाई सूडाच्या राजकारणाचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले होते. 'बीबीसीवर आयटीच्या छाप्यावरून दिसून येते की केंद्र सरकार राजकीय सूडबुद्धीसाठी आयकर, सीबीआय आणि ईडी सारख्या केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे, 'बीबीसी ही एक प्रेस आहे आणि प्रेस हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. ही कारवाई लोकशाहीवर हल्ला असून केंद्र सरकार त्याला जबाबदार आहे, असा आरोपही सुनील सिंग यांनी केला. 

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीही भाजपवर टीकास्त्र सोडले. 'देशात प्रत्येक धर्म आणि पंथाचे लोक राहतात. कोणाला भारताला 'हिंदू राष्ट्र' बनवायचे असेल, तर त्याला देश नष्ट करायचा आहे. भारतात हे शक्य आहे का?, असंही ते म्हणाले.

Web Title: bihar deputy cm tejashwi yadav slams bjp over bbc it survey said bjp wants make india country of nathuram godse