बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 03:56 PM2020-11-10T15:56:01+5:302020-11-10T15:57:08+5:30

बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे.

In Bihar, the clock has not rung, the NCP has less votes than notes | बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं

बिहारमध्ये घड्याळाचा गजर वाजलाच नाही, राष्ट्रवादीला नोटापेक्षा कमी मतं

googlenewsNext

पाटणा : बिहार विधानसभा निवडणूक निकालाची मतमोजणी सुरू झाली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर आलेल्या एक्झिट पोलमधून राज्यात सत्तापरिवर्तनाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र आज मतमोजणीचे कल समोर येऊ लागल्यापासून या सुरुवातीच्या कलांमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने आघाडी घेतली आहे. आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीए 130 तर महाआघाडी 102 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादीला बिहार निवडणुकांत नोटापेक्षाही कमी मतदान झाले आहे. 
 
बिहार निवडणुकांत सद्यपरिस्थितीनुसार (दुपारी 3.00 वाजता) निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकड्यांनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत आहे. कारण, शिवसेना आणि राष्ट्रवादीला अद्याप एकाही जागेवर आघाडी घेत आली नाही. शिवसेनेनं उभा केलेल्या 23 पैकी 21 जागांवर तर शिवसेनेच्या वाट्याला ‘नोटा’पेक्षाही कमी मतं मिळाली आहेत. शिवसेनेने 50 उमेदवार देण्याची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात 23 जागांवरच निवडणूक लढवली. तर, राष्ट्रवादी काँग्रेसनंही स्वतंत्रपणे बिहार निवडणुका लढवल्या होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यामध्ये, शरद पवार हे राष्ट्रवादीचे प्रमुख स्टार प्रचारक होते. मात्र, कोरोना प्रादुर्भावामुळे त्यांनी बिहारमध्ये प्रचारसभा घेतल्या नसल्याचं सांगण्यात येतं.  

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील आकडेवाडीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसला 0.22 टक्के मतं मिळाली आहेत. तर, शिवसेनेला 0.05 टक्के मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही पक्षांच्या मतांपैकी नोटाला पडलेली मतं अधिक आहेत. विधानसभा निवडणुकीत 1.74 टक्के नागरिकांनी नोटाला पसंती दिली आहे. नोटाला एकूण 3 लाख 18 हजार 34 मते मिळाली आहेत. तर एमआयएमला 1.08 टक्के मते मिळाली असून त्यांचे तीन उमेदवार आघाडीवर आहेत. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दर्शविणाऱ्या आघाडी आणि पिछाडीच्या आकडेवारीत राष्ट्रवादीचा एकही उमेदवार दिसून येत नाही. यावरुन राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर वाजलाच नाही, असे म्हणता येईल. 

2015 मध्ये शिवसेनेनं लढवल्या 80 जागा

सन 2015 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने 243 जागांपैकी 80 जागा लढवल्या होत्या. त्यात शिवसेनेचा एकही उमेदवार निवडणूक आला नाही. मात्र, शिवसेनेला एकूण 2 लाख 11 हजार 131 मते मिळाली होती. त्यात हयाघाट, बोचहा, दिनारा जमालपूर, कुम्हरार, पटनासाहिब आणि मोरवा या सात विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराला तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. विशेष म्हणजे एकूण 35 जागांवर शिवसेनेला भाजपपेक्षाही अधिक मते मिळाली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेलाही ‘नोटा’पेक्षाही अधिक मतदान झालं नाही.
 

Web Title: In Bihar, the clock has not rung, the NCP has less votes than notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.