बिहारच्या बक्सरमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांची वाहने जाळली, नुकसान भरपाईवरून गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2023 13:59 IST2023-01-11T13:57:57+5:302023-01-11T13:59:19+5:30
बिहारच्या बक्सरमध्ये आज पोलिसांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भूमि अधिगृहन विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे.

बिहारच्या बक्सरमध्ये शेतकऱ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांची वाहने जाळली, नुकसान भरपाईवरून गोंधळ
बिहारच्या बक्सरमध्ये आज पोलिसांना शेतकऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. भूमि अधिगृहन विरोधात शेतकऱ्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांवर आज लाठीचार्ज केला, शेतकऱ्यांनी पोलिसांची वाहनांची जाळपोळ केल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मध्यरात्री पोलिसांनी शेतकऱ्यांच्या घरात घुसून लाठीचार्ज केला. शेतकऱ्यांना बेदम मारहाण करण्यात आली, त्यानंतर आज शेतकऱ्यांचा रोष उसळला. पोलिसांनी शेतकऱ्यांचा पाठलाग केल्याने वातावरण तणावपूर्ण आहे. शेतकर्यांपाठोपाठ आता पोलिसांच्या क्रूरतेचा व्हिडीओही समोर आला असून, त्याबाबतही तो अनेक प्रश्न विचारत आहे.
काँग्रेस नेते एकमेकांचे शत्रू, भाजपा दुश्मन वाटत नाही; आशिष देशमुखांनी मांडली खंत
पोलिसांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनाविरोधात मोठ पाऊल उचलले आहे. पोलिसांनी रात्री शेतकऱ्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. या संदर्भातील पोलिसांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांच्या या कारवाईचा शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला आहे.
चौसा येथे एसजेव्हीएनद्वारे वीज प्रकल्पासाठी शेतकऱ्यांचे भूसंपादन 2010-11 पूर्वीच झाले होते. 2010-11 च्या सर्कल दरानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली. कंपनीने 2022 मध्ये जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली तेव्हा शेतकरी आता सध्याच्या दरानुसार संपादित केलेल्या जमिनीची भरपाई देण्याची मागणी करत आहेत.
ही जमीन जुन्या दराने जबरदस्ती घेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याविरोधात मागील दोन महिन्यापासून बिहारमध्ये आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी आंदोलनकर्त्यां शेतकऱ्यांच्या घरात मध्यरात्री घुसून शेतकऱ्यांना मारहाण केली आहे.
आपल्या सीएसआर निधीतून येथे शाळा, हॉटेल्स आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल, सर्वत्र समृद्धी येईल, स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य दिले जाईल, असं आश्वासन चौसा येथे औष्णिक वीज प्रकल्प उभारण्यापूर्वी कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिले होते. पण, कंपनीने यातील काहीच केलेले नाही.