शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

त्या गाढवानं एका लाथेत माझी म्हैस मारली, FIR घ्या साहेब! म्हशीच्या मालकाची पोलिसात धाव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 8:16 AM

म्हशीच्या मालकाने आता गाढव आणि त्याच्या मालकाविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोघांविरुद्ध एफआर नोंदविण्याची मागणी केली आहे.

- एस. पी. सिन्हापाटणा : एका बिघडलेल्या गाढवाने जबरदस्त लाथ मारून एका तगड्या म्हशीला जागेवरच ठार केल्याची विस्मयकारी घटना बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील सहिनाव गावात घडली आहे. त्याहीपेक्षा विस्मयकारी बाब म्हणजे, म्हशीच्या मालकाने आता गाढव आणि त्याच्या मालकाविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, दोघांविरुद्ध एफआर नोंदविण्याची मागणी केली आहे.रोहतास जिल्ह्यातील दावथ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दावथ पोलीस ठाण्याचे प्रमुख अतवेंद्रकुमार यांनी सांगितले की, म्हशीच्या मालकांनी एफआयआर नोंदविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. पोलीस तपास करीत आहेत. तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.प्राप्त माहितीनुसार, गाढवाच्या मालकाचे नाव इलियास हुसैन, तर म्हशीच्या मालकाचे नाव मुनी चौधरी असे आहे. हुसैन हे आपल्या गाढवाच्या पाठीवरून खडीची वाहतूक करीत होते. त्याचवेळी चौधरी यांची म्हैस रस्त्यात चारा खात होती. जाता-जाता गाढवाने त्या म्हशीला इतक्या जोरात लाथ मारली की, म्हैस जागेवरच गतप्राण झाली. मुनी चौधरीने तक्रारीत म्हटले आहे की, म्हशीचा चारा खाऊन होईपर्यंत खडीची वाहतूक थांबव, असे आपण इलियासला सांगितले होते. मात्र त्याने ऐकले नाही.काही गावकऱ्यांनी सांगितले की, इलियासचे गाढव हिंसक असून ते इतर जनावरांवर सातत्याने हल्ले करीत आहे. याआधी त्याने अशाच प्रकारे लत्ताप्रहार करून एक गाय ठार केली होती. आता म्हैस मारली आहे. दरम्यान, ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली असून झपाट्याने ‘व्हायरल’ होत आहे.