बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 06:19 IST2025-10-07T06:19:09+5:302025-10-07T06:19:27+5:30
Bihar Assembly Election 2025: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी दिल्लीत सोमवारी पत्रपरिषदेत बिहार विधानसभा निवडणुकीची घोषणा केली.

बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : साऱ्या देशाचे लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, ६ आणि ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल. १४ नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येतील. ही घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी दिल्लीत सोमवारी पत्रपरिषदेत केली.
आयोगाने राबविलेल्या विशेष पुनरावलोकन मोहिमेवर विरोधकांनी केलेली टीका, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची व्होट अधिकार यात्रा यामुळे तेथील राजकीय वातावरण तापलेले आहे. जनता दल (यू), भाजप आघाडी सत्ता कायम राखण्यात यशस्वी होणार की राजद तसेच घटक पक्षाला सत्ता मिळणार याकडे देशाचे लक्ष असेल.
विधानसभा निवडणुकांची सर्व प्रक्रिया १६ नोव्हेंबरपर्यंत पूर्ण हाेणार. सध्या अस्तित्वात असलेल्या विधानसभेचा कार्यकाळ २२ नोव्हेंबर २०२५ रोजी समाप्त होतो.
अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १७ ऑक्टो. I २० ऑक्टो.
अर्जाची छाननी : १८ ऑक्टो. I २१ ऑक्टो. माघारी अंतिम तारीख : २० ऑक्टो. I २३ ऑक्टो.