सर्वात भ्रष्ट कुटुंबातील 2 युवराज मला शिव्या देतायेत, दोघेही हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर; मोदींचा हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:27 IST2025-10-30T14:27:07+5:302025-10-30T14:27:54+5:30
मोदी पुढे म्हणाले, दोन्ही “युवराज” हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणांत जामिनावर आहेत आणि जामिनावर असलेल्यांचा सन्मान होत नसतो.

सर्वात भ्रष्ट कुटुंबातील 2 युवराज मला शिव्या देतायेत, दोघेही हजारो कोटींच्या घोटाळ्यात जामिनावर; मोदींचा हल्लाबोल
“एक देशातील सर्वात भ्रष्ट घराण्याचा युवराज आहे, तर दुसरा बिहारमधील सर्वात करप्ट घराण्याशी संबंधित आहे. या दोघांनी मिळून आता खोट्या आश्वासनांचे दुकान सुरू केले आहे. हे दोघेही मला भर-भरून शिव्या देत आहेत. मात्र बिहारची जनता यांच्या जाळ्यात अडकणार नाही. बिहारने विकासाची गती पकडली आहे. अशा शब्दांत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजदचे तेजस्वी यादव यांच्यावर थेट हल्ला चढवला. ते बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुजफ्फरपूर येथील मोतीपूर साखर कारखान्याच्या मैदानावर आयोजित सभेत बोलत होते.
मोदी पुढे म्हणाले, दोन्ही “युवराज” हजारो कोटींच्या भ्रष्टाचार प्रकरणांत जामिनावर आहेत आणि जामिनावर असलेल्यांचा सन्मान होत नसतो. हे नामदार लोक कामगारांना शिव्या देऊनच दिवसाची सुरुवात करतात. मागास आणि दलित समाजाचा अपमान करणे हा ते त्यांचा जन्मसिद्ध अधिकार समजतात. एका चहावाला इथवर पोहोचला, हे त्यांना अजूनही पचत नाही.”
पंतप्रधान म्हणाले, राजद आणि काँग्रेसचा संबंध तेल आणि पाण्यासारखा आहे. यांचे कदीच पटू शकत नाही. बाहेरून एक दिसतात. पण आतून वेगवेगळे आहेत. त्यांचा हेतू केवळ सत्तेवर कब्जा करणे एवढाच आहे. एवढ्या एका लालसेपोटीच ते सोबत आहेत. जेनेकरून पुन्हा बिहार लुटता यावा.” यावेळी मोदींनी लालू प्रसाद यादवांवरही निशाणा साधला. ते म्हणाले, “ज्या बाबासाहेब आंबेडकरांना संपूर्ण देश पूजतो, त्यांचा हे लोक अपमान करतात.”
बिहारमध्ये एनडीएला सर्वात मोठा विजय मिळणार असून राजद-काँग्रेस आघाडीला इतिहासातील सर्वात मोठा पराभव होईल. “बिहारचे मतदार ६ नोव्हेंबरला मतदानाद्वारे या दोन्ही पक्षांना त्यांची जागा दाखवतील,” असा विश्वासही मोदींनी यावेळी व्यक्त केला.