शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर सामूहिक बलात्कार प्रकरण: "माझ्या म्हणण्याचा विपर्यास करण्यात आला, चुकीचा अर्थ काढला गेला", 'त्या' विधानावर ममतांचं स्पष्टिकरण
2
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२५ : वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस धनलाभाचा, पण इतर राशींना...
3
बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा
4
भारताच्या सरन्यायाधीशांच्या अवमानाचा प्रयत्न निंदनीय, अपमानाच्या अपराधावर काही गंभीर प्रश्न...
5
मुंबई महापालिकेत सध्याचे आरक्षित प्रभाग बदलणार; चक्राकार पद्धतीने सोडत; इच्छुकांना संधीची आशा
6
अत्यंत लाजिरवाणी घटना, भारताच्या भूमीत हे घडावे...?
7
अखेर महिला पत्रकारांना अफगाणिस्तानचे निमंत्रण
8
Viral Video: प्लॅटफॉर्मवर एकाच वेळी ३ ट्रेन आल्या अन्...; बर्दवान स्थानकावर चेंगराचेंगरीसदृश स्थिती, ७ जण जखमी
9
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
10
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
11
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
12
नागपूर पोलीस ॲक्शन मोडवर! घरफोडीच्या गुन्ह्यांत तब्बल ५७ टक्के घट, २१७ ढाबे-हॉटेलवर कारवाई
13
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
14
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
15
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
16
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
17
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
18
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
19
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
20
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई

बिहारमध्ये एनडीएचे ठरले; भाजप-जदयूला समान जागा, 'लोजपा'ला २९ तर 'रालोमो'ला ६ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 06:42 IST

२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल.

एस. पी. सिन्हा -पाटणा/ नवी दिल्ली : नोव्हेंबरमध्ये होत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) जागावाटप रविवारी ठरले. भाजप व जदयू प्रत्येकी १०१ जागांवर लढतील, तर केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या 'लोजपा (रामविलास) 'ला २९ जागा देण्यात आल्या. उपेंद्र कुशवाह यांच्या 'रालोमो 'ला ६ तर जीतनराम मांझी यांच्या 'हम' पक्षाला ६ जागा दिल्या आहेत.

२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल.

इंडिया आघाडीची आज बैठककाँग्रेसच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांच्या जागावाटपाचे सूत्र आज सोमवारी जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. राजद नेते लालूप्रसाद यादव व तेजस्वी यादव रविवारी दिल्लीला रवाना झाले असून घटक पक्षांची बैठक होणार आहे.

घटक पक्षांकडून स्वागत : हे जागावाटपजाहीर झाल्यानंतर एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी याचे जोरदार स्वागत केले. नितीशकुमार यांना पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान करण्याच्या दृष्टीने ही एकजूट असल्याचे जायसवाल म्हणाले.

छोटा भाऊ-मोठा भाऊ नव्हे, तर केली थेट बरोबरीचभाजपचे प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांनी १ माहिती देताना सांगितले की, हे जागावाटप अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पूर्ण झाले.

एनडीएच्या जागावाटपाचे सूत्र पाहता बिहार विधानसभा निवडणुकीत जनता दल (यु.) आणि भाजप यांच्यात यंदा छोटा भाऊ-मोठा भाऊ हा विचार न होता थेट दोन्ही पक्ष बरोबरीत आणण्यात आले आहेत.

नाराजी नाही : मांझी'हम'चे प्रमुख जितमराम मांझी यांनीही जागावाटपाचे स्वागत करून यात कोणतीही नाराजी नसल्याचे म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी 'हम'ला एकच जागा मिळाली, तेव्हा थोडीच आम्ही नाराज होतो?, असे मांझी यांनी म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : NDA seat-sharing finalized in Bihar; BJP, JDU get equal seats.

Web Summary : Bihar's NDA finalized seat-sharing for the upcoming elections. BJP and JDU will contest 101 seats each. LJP(Ram Vilas) gets 29, RLSP 6, and HAM 6 seats. The 'India' alliance is likely to announce its seat-sharing formula soon.
टॅग्स :Bihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५BJPभाजपाNitish Kumarनितीश कुमारNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी