प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 12:42 IST2025-10-15T12:40:49+5:302025-10-15T12:42:24+5:30
Bihar Assembly Election 2025 : जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रशांत किशोर यांचा मोठा निर्णय; बिहार विधानसभा निवडणुकीतून घेतली माघार, कारण काय..?
Bihar Assembly Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. निवडणूक रणनीतिकार आणि जन सुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आगामी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या व्यापक हिताचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. किशोर यांनी म्हटले की, जर मी स्वतः निवडणूक लढलो, तर पक्षाकडे लक्ष देता येणार नाही.
पक्षाच्या हितासाठी घेतला निर्णय
माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत प्रशांत किशोर म्हणाले, मी विधानसभा निवडणूक लढवू नये, असे पक्षानेच ठरवले आहे. त्यामुळेच राघोपुर मतदारसंघातून तेजस्वी यादवांविरोधात दुसरा उमेदवार देणार आहोत. हा निर्णय पक्षाच्या एकूण फायद्यासाठी घेतला आहे. जर मी निवडणूक लढलो असतो, तर माझे लक्ष संघटन आणि तयारीपासून विचलित होईल.
VIDEO | EXCLUSIVE: "No, I won't contest. Party has decided... I will continue to do the work I have been doing in the party. I will continue with the organisational work for the larger interest of the party," Jan Suraaj (@PrashantKishor) founder Prashant Kishor said responding to… pic.twitter.com/aYpbz9mpth
— Press Trust of India (@PTI_News) October 15, 2025
150 पेक्षा कमी जागा म्हणजे पराभव
पीके पुढे म्हणाले, जर जन सुराज पक्षाला 150 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर मी त्याला पराभव समजेल. मी आधीच सांगितले आहे की, आम्हाला 10 पेक्षा कमी किंवा 150 पेक्षा जास्त जागा मिळतील. आधे-मधे काही शक्यता नाही. जर आम्हाला 120 किंवा 130 जागा मिळाल्या तरी ते आमच्यासाठी पराभवच असेल. जन सुराज पक्ष बिहार निवडणुकीत यशस्वी झाला, तर त्याचा परिणाम केवळ बिहारपुरता मर्यादित राहणार नाही, तर तो देशाच्या राजकारणाच्या दिशेलाही बदल घडवेल.
शानदार विजय किंवा जबरदस्त पराभव
त्यांनी पुढे सांगितले, या निवडणुकीत आम्ही शानदार विजय मिळवू किंवा पूर्णपणे पराभूत होऊ. जर आम्ही जिंकलो, तर बिहार बदलण्याची आणि त्याला देशातील टॉप 10 राज्यांमध्ये नेण्याची जबाबदारी आमच्यावर येईल. पण जर आम्ही जिंकू शकलो नाही, तर याचा अर्थ लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलेला नाही. मग आम्हाला पुन्हा रस्त्यावर उतरुन समाजकार्य करावे लागेल.