स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 17:36 IST2025-11-03T17:33:48+5:302025-11-03T17:36:02+5:30
'छठ महापर्वाला ड्रामा म्हणणाऱ्यांना बिहारची जनता धडा शिकवेल'

स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
Bihar Assembly Election 2025: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कटिहार जिल्ह्यातून राजद (RJD) आणि काँग्रेसवर तीव्र टीका केली. त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांवर आरोप केला की, काँग्रेसच्या नामदार नेत्याने छठ महापर्वाला ‘ड्रामा’ म्हटले, जेणेकरून बिहारची जनता राजदवर राग व्यक्त करेल आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागेल. राजदने काँग्रेसला “बंदूक” दाखवून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करवून घेतल्याचा दावाही मोदींनी केला.
Watch LIVE: PM Shri @narendramodi addresses public rally in Katihar, Bihar. https://t.co/iFYoFsIpM1
— BJP (@BJP4India) November 3, 2025
वडिलांचे नाव घेण्यास लाज का वाटते?
राजदच्या प्रचारपोस्टरवर माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांचा फोटो नसल्याचा मुद्दा उपस्थित करत मोदी म्हणाले, राजद आणि काँग्रेसच्या पोस्टर्सकडे बघा. ज्यांनी बिहारमध्ये जंगलराज आणले, त्या लालू यादवांचा फोटो पोस्टरवरुन गायब आहे, किंवा असे लहान करून लावला आहे. आपल्या वडिलांचे नाव घेण्यास लाज का वाटते? कोणती पापे केली, जे बिहारच्या युवकांपासून लपवत आहात? असा बोचरा सवाल मोदींनी विचारला.
राजदचा मतदार काँग्रेस हिसकावून घेणार
काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले, जे लोक बिहारच्या जनतेचा अपमान करतात, त्यांनाच काँग्रेसने प्रचारासाठी बोलावले आहे, जेणेकरून बिहारचा राग राजदवरच उतरेल. काँग्रेसला माहिती आहे की, जर राजद पुन्हा हरले, तर त्यांचे राजकारण संपेल आणि काँग्रेस त्यांचा मतदारवर्ग बळकावेल. काँग्रेस बिहारच्या लोकांचा अपमान नियोजनपूर्वक करवून घेत आहे. केरळमधील काँग्रेस नेत्याने बिहारच्या लोकांची तुलना ‘बीडी’शी केली, हा सगळं त्यांच्या नीतीचा भाग आहे, अशी टीकाही त्यांनी केली.