‘जेवढी भागीदारी-तेवढी हिस्सेदारी’ सूत्राकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष; वल्गना विरल्या हवेतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2025 07:03 IST2025-10-21T07:02:48+5:302025-10-21T07:03:56+5:30
बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी झालेल्या जातनिहाय जनगणनेची प्रचंड चर्चा झाली होती.

‘जेवढी भागीदारी-तेवढी हिस्सेदारी’ सूत्राकडे सर्वच पक्षांचे दुर्लक्ष; वल्गना विरल्या हवेतच
विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : बिहारमध्ये निवडणुकीपूर्वी झालेल्या जातनिहाय जनगणनेची प्रचंड चर्चा झाली होती. या सर्वेक्षणाच्या आधारे राजकारण व सत्तेत संबंधित घटकांची भागिदारी निश्चित केली जाण्याच्या गोष्टी सर्वांनीच केल्या होत्या. परंतु, प्रत्यक्षात असे घडलेलेच नाही. बहुतांश राजकीय पक्षांनी ‘जेवढी भागिदारी-तेवढी हिस्सेदारी’ या सूत्राकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
ही जातीय जनगणना करणाऱ्या जदयूनेही हे सूत्र उमेदवारी वाटपात पाळले नसल्याचे चित्र आहे. संख्येच्या आधारे अल्पसंख्यांकांना तेवढा वाटा दिलेला नाही. उलट राजपूत समाजात मोठी उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे तिकीटवाटप...
राजपूत-२१, भूमिहार-१५, ब्राह्मण-११, वैश्य -१७, मागास -१२, अतिमागास -७, यादव -६, कोईरी -६.
‘जदयू’ने दिलेला वाटा
आर्थिक मागास व ओबीसी -५९, कुर्मी -१२, यादव -८, मुसहर व रविदास -५, उर्वरित जागा अन्य जातींना.
बिहारमध्ये राजपूत मतदारांची संख्या ३.४५ टक्के आहे. परंतु भाजपने या घटकांना दिलेला वाटा २१ टक्के आहे.