ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 07:31 IST2026-04-01T07:31:07+5:302026-04-01T07:31:52+5:30

LPG Cylinder Price Hike From 1 April 2026: १ एप्रिल २०२६ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. 

big setback now commercial lpg gas cylinder will become costlier from 1 april 2026 in delhi price increased by 195 and in kolkata by Rs 218 | ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला?

ज्याची भीती, तेच झाले! LPG सिलिंडरचे दर वाढले; आधीच टंचाई, त्यात खिशाला कात्री, किती महागला?

LPG Cylinder Price Hike From 1 April 2026: अमेरिका इस्रायल इराण युद्धामुळे देशात आधीच इंधन पुरवठ्याबाबत संभ्रमाची स्थिती असताना, एलपीजी गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. १ एप्रिल २०२६ पासून ही दरवाढ लागू करण्यात आली आहे.  देशभरातील अनेक ठिकाणी गॅससाठी लोक रांगा लावताना दिसत आहेत. गॅस बुक करून अनेक दिवस उलटल्यानंतरही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्यासायिक एलपीजी सिलिंडरचा पूर्ण क्षमतेने पुरवठा होत नाही. यातच आता ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. 

आखातातील युद्धामुळे घरगुती गॅस सिलिंडरची टंचाई वाढत असून, देशातील जनता मेटाकुटीला आली आहे. देशातील हॉटेल, लघू खानपान व्यवसाय संकटात सापडले आहेत. सिलिंडरचा पुरवठा नियमित होत नसल्याने मच्छिमार बांधवांपासून ते खानावळींपर्यंत सगळ्यांपुढेच मोठा प्रश्न उभा राहिला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा सरकारकडून वाढवण्यात आला असला, तरी अद्यापही तुटवडा जाणवत आहे. यातच आता व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर वाढल्याने अडचणीत आणखी भर पडणार असल्याचे म्हटले जात आहे.

कुठे आणि किती महागला एलपीजी सिलिंडर?

१९ किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर आजपासून महाग होणार आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची किंमत १९५.५० रुपयांनी, तर कोलकातामध्ये २१८ रुपयांनी वाढली असून, ही दरवाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये १९ किलोच्या सिलिंडरची अंतिम किंमत २०७८.५० रुपये असेल, तर ५ किलोच्या FTL सिलिंडरची किंमत ५४९ रुपये (रिफिलसाठी) असेल.

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. अशातच त्या ठिकाणी गॅस सिलिंडरचे दर वाढणार नाहीत, असे दावे केले जात होते. परंतु, या सगळ्याला छेद देत कोलकाता येथे २१८ रुपयांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महाग झाला आहे. याचा परिणाम निवडणुकीवर होणार का, याकडे आत राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. 

Web Title : डर सच हुआ! एलपीजी सिलेंडर के दाम बढ़े, उपभोक्ताओं पर बोझ

Web Summary : अमेरिका, इजराइल और ईरान के युद्ध के बीच ईंधन आपूर्ति को लेकर चिंता के माहौल में, 1 अप्रैल 2026 से एलपीजी गैस सिलेंडर की कीमतें बढ़ गई हैं। इस मूल्य वृद्धि से संभावित कमी का सामना कर रहे उपभोक्ताओं पर वित्तीय दबाव बढ़ेगा।

Web Title : Feared event occurs! LPG cylinder prices rise, burdening consumers.

Web Summary : LPG gas cylinder prices have increased starting April 1, 2026, amid concerns about fuel supply due to the ongoing conflict between the US, Israel, and Iran. This price hike adds financial strain to consumers already facing potential shortages.