शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 23:10 IST

...या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली.

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून (NDA) झालेल्या दारूण पराभवानंतर काँग्रेसने दिल्लीतील पक्ष मुख्यालय असलेल्या इंदिरा भवनमध्ये गुरुवारी (२७ नोव्हेंबर २०२५) आढावा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेस नेत्यांमध्ये मोठा राडा झाल्याचे वृत्त आहे. काही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, एका नेत्याने हातवारे करत 'गोळी मारण्याची' धमकी दिली.

एबीपी न्यूजने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या वेटिंग रूममध्ये बिहारमधील वैशालीचे नेते इंजिनिअर संजीव आणि पप्पू यादव यांचे निकटवर्तीय उमेदवार जितेंद्र कुमार यांच्यात बाचाबाची झाली. बाहेरच्या लोकांना तिकीट दिले जाते, असे म्हणत संजीव यांनी हातवारे करत गोळी मारण्याची धमकी दिली. या घटनेची माहिती राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना देण्यात आली आहे.

इंजिनिअर संजीव म्हणाले... -इंजिनिअर संजीव यांनी मात्र वादाच्या वृत्ताचे खंडन केले. ते म्हणाले, 'मी कोणाला जीवे मारण्याची धमकी दिली, अशा बातम्या खोट्या आणि निराधार आहेत. माझा कोणाशीही वाद झालेला नाही. काही उमेदवार आपली बाजू मांडण्यासाठी आले होते, त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. कोणताही वाद किंवा गोळी चालवण्याबद्दलची चर्चा झाली नाही. या अफवांवर लक्ष देऊ नये.'

केसी वेणुगोपाल काय म्हणाले? -बैठकीसंदर्भात बोलताना काँग्रेसचे संघटन महासचिव केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी आमदारांकडून तसेच पराभूत उमेदवारांकडून १० च्या समूहाने फीडबॅक घेतला. या बैठकीला बिहार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश राम, कृष्णा अल्लावरू, तारिक अन्वर, पप्पू यादव आणि कन्हैया कुमार हे देखील उपस्थित होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress brawl before Bihar review: Leaders clash, threat alleged.

Web Summary : A major fight erupted among Congress leaders before a Bihar election review meeting. Allegedly, a leader threatened to shoot another during an argument about ticket distribution. Party leaders are investigating the incident.
टॅग्स :congressकाँग्रेसBihar Assembly Election 2025बिहार विधानसभा निवडणूक २०२५Rahul Gandhiराहुल गांधीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडी