शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

मलिकांना पुन्हा मोठा दिलासा; सुप्रीम कोर्टाने जामीन ६ महिन्यांसाठी वाढवला, EDचा आक्षेप नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 13:20 IST

सुप्रीम कोर्टाने जामिनाची मुदत वाढवल्याने नवाब मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Nawab Malik ( Marathi News ) : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मलिक यांना वैद्यकीय आधारावर मिळालेल्या जामिनाची मुदत आणखी सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या अंतरिम जामिनाची मुदत ९ जानेवारी रोजी संपल्याने त्यात वाढ करून देण्याची विनंती मलिक यांच्या वकिलांकडून कोर्टाकडे करण्यात आली होती. ही विनंती मान्य करत कोर्टाने मलिकांच्या जामिनाची मुदत आणखी सहा महिन्यांनी वाढवली. विशेष म्हणजे यावेळी ईडीकडून कोर्टात मलिक यांच्या या विनंतीला आक्षेप घेण्यात आला नाही.

नवाब मलिक यांना अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्याच्या संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर मलिक यांनी त्यांच्या आजारपणाचे कारण देत अंतरिम जामिनासाठी विशेष न्यायालयात अर्ज केला. मात्र, विशेष न्यायालयाने व त्यापाठोपाठ उच्च न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळल्याने मलिक यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आपली एक किडनी काम करत नसून दुसरी किडनी कमजोर असल्याचे कारण त्यांनी जामीन अर्जात दिले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने मलिक यांना वैद्यकीय आधारावर जामीन अर्ज मंजूर केला होता.  आता पुन्हा एकदा जामिनाची मुदत वाढवल्याने मलिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नवाब मलिक आणि राजकीय वादंग

नवाब मलिक यांना वैद्यकीय आधारावर मिळालेल्या जामिनानंतर मागील महिन्यात झालेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात ते सभागृहात हजर राहिले होते. यावेळी ते सत्ताधारी बाकांवर बसल्याने मोठं वादंग झालं होतं. ज्या मलिकांवर भाजपने देशद्रोहासारखे गंभीर आरोप केले, त्याच मलिकांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, अशा शब्दांत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपला लक्ष्य करण्यात आलं. त्यानंतर भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना जाहीर पत्र लिहीत नवाब मलिक यांना महायुतीपासून दूर ठेवण्याची विनंती केली होती. फडणवीस यांच्या या पत्रामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती.

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय