पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 08:02 IST2026-04-04T08:02:22+5:302026-04-04T08:02:22+5:30

Shashi Tharoor Convoy Attack In Keralam: काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे.

big news congress mp shashi tharoor convoy attacked car stopped security person beaten up | पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण

पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण

Shashi Tharoor Convoy Attack In Keralam: काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे वृत्त आहे. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर भागात हा हल्ला झाल्याचे समजते. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युडीएफ उमेदवार ए. पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी शशी थरूर जात होते. अचानक काही अज्ञातांनी शशी थरूर यांचा ताफा अडवला. तसेच सुरक्षा रक्षकाला मारहाण केली. 

शशी थरूर यांच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार, शशी थरूर हे दोन वाहनांच्या ताफ्यातून प्रवास करत असताना ही घटना घडली. शशी थरूर पहिल्या वाहनात होते. अचानक दोन वाहनांमधून आलेल्या सुमारे आठ जणांनी थरूर यांचे वाहन रस्त्याच्या मधोमध जबरदस्तीने थांबवले. हल्लेखोरांनी वाहनाला पुढे जाण्यापासून रोखले आणि कारच्या खिडक्यांवर हातांनी ठोठावायला सुरुवात केली, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सुरक्षा कर्मचाऱ्याचा वेळीच हस्तक्षेप, हल्लेखोरांनी केली मारहाण

परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहताच शशी थरूर यांच्या बंदूकधारी सुरक्षा कर्मचाऱ्याने हस्तक्षेप केला. शशी थरूर यांच्या बचावासाठी आणि रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. परंतु, हल्लेखोरांनी त्या सुरक्षा रक्षकालाच धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. या प्रकारामुळे घटनास्थळी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. या घटनेची माहिती तात्काळ स्थानिक पोलिसांना देण्यात आली. यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना ताब्यात घेतले आहे. हा हल्ला पूर्वनियोजित होता की रस्त्यावरील वादातून झाला, याची आता चौकशी सुरू आहे.

दरम्यान, केरळ विधानसभा निवडणुकीत १४० जागांसाठी ९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदान आणि निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर केले जातील. त्यामुळे शशी थरूर प्रचारासाठी केरळमध्ये गेले होते. शशी थरूर यांच्या सुरक्षेतील चूक अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत असल्याचे म्हटले जात आहे.

 

Web Title : चौंकाने वाला: कांग्रेस सांसद शशि थरूर के काफिले पर केरल में हमला

Web Summary : केरल के मलप्पुरम जिले में कांग्रेस सांसद शशि थरूर के काफिले पर हमला हुआ। थरूर यूडीएफ उम्मीदवार के लिए प्रचार करने जा रहे थे तभी अज्ञात लोगों ने काफिला रोका और एक सुरक्षा गार्ड पर हमला कर दिया। अधिक जानकारी की प्रतीक्षा है।

Web Title : Shocking: Attack on Congress MP Shashi Tharoor's Convoy in Kerala

Web Summary : Shashi Tharoor's convoy was attacked in Kerala's Malappuram district. The incident occurred while Tharoor was en route to campaign for a UDF candidate. Unidentified individuals stopped the convoy and assaulted a security guard. Further details are awaited.