मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वीच सापडला गावठी बॉम्बचा साठा अन्...; सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:22 IST2026-03-25T13:21:45+5:302026-03-25T13:22:32+5:30
बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होतील. महत्वाचे म्हणजे, २०२१ मध्ये आठ टप्प्यांत झालेली निवडणूक यंदा केवळ दोन टप्प्यांत आटोपली जाणार आहे.

मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये मतदानापूर्वीच सापडला गावठी बॉम्बचा साठा अन्...; सुरक्षा यंत्रणा हायअलर्टवर!
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर, येथील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातच आता, दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. पोलीस प्रशासनाने राबवलेल्या विशेष शोध मोहिमेत तब्बल ८४ गवठी बॉम्ब आणि एक रायफल जप्त करण्यात आली.
तलावातून हस्तगत करण्यात आली रायफल -
महत्वाचे म्हणजे, ही रायफल एका तलावातून हस्तगत करण्यात आली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बिजयगंज बाजार पोलिसांनी निवडणूक सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त केलेला शस्त्रसाठा कुणाचा होता आणि त्याचा उद्देश काय होता? यासंदर्भात पोलीस तपास करत आहेत.
बंगालमध्ये यंदा दोन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. २३ आणि २९ एप्रिल रोजी मतदान पार पडणार असून ४ मे रोजी निकाल जाहीर होतील. महत्वाचे म्हणजे, २०२१ मध्ये आठ टप्प्यांत झालेली निवडणूक यंदा केवळ दोन टप्प्यांत आटोपली जाणार आहे.
ही निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची -
विशेष म्हणजे, यावेळची निवडणूक अनेक कारणांनी महत्त्वाची ठरत आहे. मतदार यादीच्या पुनरीक्षणानंतर (SIR) सुमारे ६३ लाख ६६ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली असून, ६० लाखांहून अधिक नावे अद्याप चौकशीच्या फेऱ्यात आहेत. तृणमूल काँग्रेस पुन्हा एकदा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीच्या आखाड्यात उतरली आहे, तर भाजपने अद्याप मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. भाजप आणि टीएमसी यांच्यातील या अटीतटीच्या लढतीत हुमांयू कबीर यांचे नवीन राजकीय समीकरण काय भूमिका बजावते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.