शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

हरियाणा सरकार कोसळलं; लोकसभा निवडणुकांपूर्वीच मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांचे राजीनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 11:54 AM

हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे

हरियाणा - आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापलं असून अनेक घडामोडी घडत आहेत. हरियाणात भाजपाने मोठी खेळी खेळली असून राज्यातील भाजपा-जननायक जनता पार्टीचे सरकार कोसळलं. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासह हरियाणा सरकारमधील सर्वच मंत्र्यांनी सामूहिक राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हरियाणात पुन्हा नवीन मंत्रिमंडळ बनवण्यात येणार आहे. कारण, हरियाणात भाजपा आणि जननायक जनता पार्टीची आघाडी तुटल्याचे समजते. 

हरियाणामध्ये भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची आज बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत अर्जुन मुंडा आणि तरुण चौक निरिक्षक म्हणून सहभागी होतील. काही वेळापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांना भेटल्याची बातमी आली होती. यावेळी लोकसभेच्या जागावाटपावर चर्चा होणार होती. त्यात जेजीपी भाजपाकडे १ ते २ लोकसभा जागांची मागणी करत होते. याआधीही सोमवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची दुष्यंत चौटाला यांनी भेट घेतली. पण निवडणुकीत आघाडीबाबत काही निर्णय झाला नाही. त्यात, आता हरयाणातील सर्वच मंत्र्यांनी सामूहिक राजीनामा दिला असून मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची गाडी राजभवनमधून बाहेर पडत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. त्यामुळे, राज्यातील भाजपा व जेजेपी यांची आघाडी संपुष्टात आली आहे. सूत्रांनुसार, भाजपा जेजेपीला जागा सोडण्यास तयार नाही. हरियाणातील सर्व १० जागांवर भाजपा उमेदवार देणार आहे. परंतु त्यातील एकही जागा मित्रपक्ष जेजेपीला सोडण्यास तयार नाही. त्यातच हरियाणातील अपक्ष आमदार नयन पाल रावत यांनी सांगितले की, मी मुख्यमंत्री खट्टर यांची भेट घेतली. आम्ही आधीपासून मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीवर आमची चर्चा झाली. जेजेपीसोबतची आघाडी तुटण्याची सुरुवात झालीय असं त्यांनी म्हटलं होते. 

हरियाणा विधानसभेतील स्थिती

भाजपा - ४१भाजपासोबत असलेले अपक्ष ६हरियाणा लोकहित पार्टी - १ ( भाजपाला पाठिंबा)जेजेपी वेगळे झाल्यास भाजपाला पाठिंबा देणाऱ्यांची संख्या ४८बहुमतासाठी लागणारा आकडा - ४६

टॅग्स :Amit Shahअमित शाहHaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्रीResignationराजीनामाBJPभाजपाElectionनिवडणूक