शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचलमध्ये मोठा गोंधळ: दिल्ली पोलिसांचे 20 जवान हिमाचल पोलिसांच्या ताब्यात, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 20:02 IST

दिल्ली पोलिसांची कारवाई स्वतःवरच उलटली!

नवी दिल्ली येथे आयोजित AI समिटमध्ये गोंधळ घालणाऱ्या युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या दिल्लीपोलिसांच्या 20 जवानांना हिमाचल पोलिसांनी अटक केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, या कारवाईची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार चंदीगड-कालका-शिमला राष्ट्रीय महामार्गावर घडला. 

AI समिटमधील आंदोलनातून प्रकरणाची सुरुवात

या घटनेचा संबंध दिल्लीमध्ये आयोजित AI समिटशी आहे. या परिषदेदरम्यान काही युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शर्टलेस आंदोलन केले. आंदोलनानंतर तीन कार्यकर्ते हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रोहडू परिसरातील एका हॉटेलमध्ये लपून बसले. दिल्ली पोलिसांना त्यांच्या ठिकाणाची माहिती मिळाल्यानंतर एक विशेष पथक रोहडूकडे रवाना झाले. तेथून तिघांनाही ताब्यात घेऊन दिल्लीला नेत असताना हा वाद उद्भवला.

सोलन पोलिसांची नाकाबंदी, 20 जवान ताब्यात...

दिल्ली पोलिसांच्या या कारवाईची माहिती मिळताच सोलन पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. धर्मपूरजवळ महामार्गावर नाकाबंदी करत दिल्ली पोलिसांच्या वाहनांना थांबवण्यात आले. याच ठिकाणी दिल्ली पोलिसांचे 20 जवान ताब्यात घेण्यात आले. या घटनेनंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आणि दोन्ही राज्यांच्या पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला.

शिमला न्यायालयात कार्यकर्त्यांना हजर

ताब्यात घेतलेल्या तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना शिमला जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारीही न्यायालयात उपस्थित होते. दरम्यान, या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे. विरोधी पक्षांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, ही राजकीय सूडबुद्धीने केलेली कारवाई असल्याचा आरोप केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Himachal Pradesh: Delhi Police Detained After AI Summit Arrests

Web Summary : Delhi police, pursuing Youth Congress activists after an AI summit protest, were detained by Himachal police. The incident, sparked by arrests near Shimla, has escalated tensions and sparked political controversy. The activists were presented in Shimla court.
टॅग्स :delhiदिल्लीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशPoliceपोलिस