शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

भारत सरकारची मोठी घोषणा! 'अशा' व्यक्तीच्या पत्नी किंवा आई वडिलांना आयुष्यभर मोफत रेल्वे प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:09 IST

कोविड-१९ महामारीपूर्वी रेल्वेमध्ये सुमारे ५० श्रेणींमध्ये सवलतीचा प्रवास उपलब्ध होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर अनेक व्यक्तींचा समावेश होता.

नवी दिल्ली - सैन्यात मेडल अथवा पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तीला आणि त्याच्या पत्नीला रेल्वे प्रवासात काही श्रेणीत मोफत प्रवासाचा लाभ मिळणार आहे. सरकारकडून रेल्वेला याबाबत निर्देश जारी करण्यात आले आहेत. कोरोनाच्या आधीपर्यंत रेल्वे प्रवासात अनेक श्रेणींमध्ये सवलती किंवा सूट मिळत होती पण त्यानंतर ते मर्यादित करण्यात आले. 

ANI या वृत्तसंस्थेने एका संरक्षण अधिकाऱ्याच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. भारत सरकारने एक आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार, लष्कर, नौदल,  वायुसेनेच्या शौर्य पदकाचे मानकरी आणि त्यांच्या जोडीदारांना (विधुरांना त्यांच्या पुनर्विवाहापर्यंत) एका सहप्रवाशासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आयुष्यभर मोफत प्रवास करण्याचा हक्क असेल. ज्यांना मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे आणि त्यावेळी ते अविवाहित होते त्यांच्या पालकांना एका सहप्रवाशासह भारतीय रेल्वेच्या गाड्यांमध्ये आयुष्यभर मोफत प्रवास करण्याचा हक्क असेल. याचा लाभ फर्स्ट क्लास/२ एसी/एसी चेअर कारमधील प्रवासासाठी मिळेल.

पूर्वी सवलतीत प्रवासाचा मिळायचा लाभ

कोविड-१९ महामारीपूर्वी रेल्वेमध्ये सुमारे ५० श्रेणींमध्ये सवलतीचा प्रवास उपलब्ध होता. यामध्ये ज्येष्ठ नागरिक आणि इतर अनेक व्यक्तींचा समावेश होता. परंतु कोविड-१९ महामारीच्या काळात ही सवलत रद्द करण्यात आली. नंतर काही सवलती पुन्हा सुरू करण्यात आल्या, परंतु त्यांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी आहे.

दरम्यान, भारतीय सैन्यातील शौर्य पुरस्कार हे सैनिकांनी दाखवलेल्या अतुलनीय धाडस, शौर्य आणि बलिदानासाठी दिले जातात. यात २ प्रकार असतात. पहिला युद्धकाळातील शौर्य पुरस्कार, जे शत्रूसमोर लढल्याने दिले जातात. त्यात परमवीर चक्र, महावीर चक्र, वीर चक्र यांचा समावेश असतो. तर दुसरा शांतताकाळातील शौर्य पुरस्कार जे युद्ध नसताना दहशतवादविरोधी कारवाई  किंवा बचावकार्यासाठी दिले जाते. यात अशोक चक्र, किर्ती चक्र, शौर्य चक्र यांचा समावेश असतो. 

English
हिंदी सारांश
Web Title : Free Rail Travel for Spouses, Parents of Gallantry Award Winners

Web Summary : The Indian government offers free rail travel in select classes to gallantry award winners' spouses or parents, and an accompanying person. This benefit extends to first class, 2 AC, and AC chair car travel, honoring their sacrifice and bravery.
टॅग्स :railwayरेल्वेindian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानindian navyभारतीय नौदलCentral Governmentकेंद्र सरकार