पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे. यातच सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी राजस्थानातील भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरून एका पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे, दोन आठवड्यांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला. याच दरम्यान सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतले होते.
माध्यमांती सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थान फ्रंटियरच्या बीएसएफ यूनिटने या पाकिस्तानी रेंजरला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. मात्र, तो भारतीय सीमेत कसा आला, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही.