शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिराच्या भूमिपूजनामुळे कोरोना संकटकाळात नागरिकांचे मनोबल वाढणार : गोविंदगिरी महाराज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2020 13:31 IST

संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे.

ठळक मुद्देयेत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण

पुणे : अयोध्येतील राममंदिर हा फक्त मंदिर आणि एका वास्तूचा प्रश्न नाही तर स्वाभिमानाचा विषय आहे. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत देशातील लोकांचे मनोबल वाढले पाहिजे आणि राम मंदिर भूमीपूजनाच्या कार्यक्रमामुळे देशातील लोकांचं मनोबल नक्कीच वाढणार आहे. या मंदिराच्या निर्मिती प्रक्रियेमुळे लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होणार आहे.हा भूमिपूजनाचा निर्णय राष्ट्राचा मनोबल वाढवणारा आहे. कोरोनाशी दोन हात करताना औषधासह हा महत्वाचा उपाय ठरणार आहे, असे मत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र निर्माण ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केले. येत्या ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त पुण्यात राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र विश्वस्त यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. गोविंदगिरी महाराज म्हणाले, संपूर्ण देश गेली कित्येक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण जवळ आलाय. १६१ फूट उंच, २ मजले मंदिर व त्यावर शिखर असे मंदिराचे स्वरुप असणार आहे. आरंभापासून तीन ते साडे तीन वर्षी राम मंदिर उभारणीला लागतील. नवीन राममंदिर स्वरूप बदललं आहे त्यामुळे तीन वर्षे लागणार आहे. सर्व भारतीय परंपरेनेच होईल.निर्मिती प्रक्रियेत १०८ एकर जमीन असेल,त्यात काही दान म्हणून येईल,काही विकत घ्यावी लागेल. यापैकी आठ एकरात मंदिर निर्माण होणार आहे. तत सर्व देशाचं प्रतिबिंब दिसले पाहिजे असे साकारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे मंदिर २ एकरामध्ये असणार आहे. येत्या ५ ऑगस्टला होणाऱ्या भूमिपूजन सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. गुजरातमधील सोमपुरा परिवाराकडून हे बांधण्यात येणार आहे. निमंत्रण कुणाला द्यायचं, नाही द्यायचं याची यादी तयार करण्याचं काम सुरू आहे.

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन कार्यक्रमाला देशातील सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना बोलावलं तर हे सगळे हेलिकॉप्टरने येतील. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टरत्या स्थळी आली तर त्यांची व्यवस्था करणे शक्य होणार नाही..पण तरीही ज्यांना यायचं असेल त्यांचं स्वागत असेल असेही गोविंदगिरी महाराज म्हणाले. 

 

टॅग्स :PuneपुणेAyodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस