Odisa Train Accident : बालासोर रेल्वे अपघात संदर्भात मोठी अपडेट! CBIने ५ जणांना ताब्यात घेतले, बहंगा स्टेशन केले सील

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 10:04 AM2023-06-12T10:04:26+5:302023-06-12T10:12:42+5:30

ओडिशामध्ये २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर सीबीआयचे दहा सदस्यीय पथक तपास करत आहे.

bhubanehwar odisha train tragedy cbi detains 5 people including an officer seals bahanga station | Odisa Train Accident : बालासोर रेल्वे अपघात संदर्भात मोठी अपडेट! CBIने ५ जणांना ताब्यात घेतले, बहंगा स्टेशन केले सील

Odisa Train Accident : बालासोर रेल्वे अपघात संदर्भात मोठी अपडेट! CBIने ५ जणांना ताब्यात घेतले, बहंगा स्टेशन केले सील

googlenewsNext

ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहंगा येथे २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वेअपघातात अनेकांचा मृ्तूय झाला. तर ११०० हून अधिकजण जखमी आहेत. या प्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाने (CBI) रविवारी पाच जणांना ताब्यात घेतले. पाच जणांमध्ये एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. सीबीआयने बहनगा एएसएमला ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या तपासादरम्यान, केंद्रीय ब्युरोने अनेकांची चौकशी केली आणि रविवारी संध्याकाळी उशिरा पाच जणांना ताब्यात घेतले. २ जून रोजी झालेल्या भीषण रेल्वे अपघातानंतर सीबीआय या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सीबीआयचे दहा सदस्यीय पथक या प्रकरणाचा तपास करत असून या प्रकरणाशी संबंधित अनेकांची चौकशी करत आहे.

Cyclone Biparjoy : बिपरजॉयने बदलला मार्ग, गुजरातच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकले, IMD ने दिला इशारा

प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रभारी असलेले सुमारे नऊ अधिकारी आता सीबीआयच्या चौकशीत आहेत. सेंट्रल ब्युरो सहायक स्टेशन मास्तर आणि गेट मॅनची चौकशी करत आहे.

बहनगा बाजार ठाणे सील करण्यात आले आहे, तर वैज्ञानिक पथकाने अनेक नमुने ताब्यात घेतले आहेत. रिले कक्षही तपासाच्या कक्षेत घेण्यात आला आहे. सीबीआयने परवानगी दिल्याशिवाय या स्थानकावर कोणत्याही ट्रेनला थांबू दिले जाणार नाही.

या तपासाबाबत दक्षिण-पूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी शनिवारी सांगितले की, पुढील आदेशापर्यंत बहनगा बाजार रेल्वे स्थानकावर कोणतीही ट्रेन थांबणार नाही. विशेष म्हणजे अपघात झाल्यापासून सीबीआयची टीम बालासोरमध्ये तळ ठोकून आहे. सीबीआयच्या पथकाला या अपघाताचा सुगावा लागला आहे.

सीबीआयचे पथक बहनगा बाजार रेल्वे स्थानकाला सतत भेट देत आहे. तपासादरम्यान सीबीआयने ठाण्यातील विविध संगणकांच्या हार्ड डिस्कही जप्त केल्या आहेत. याशिवाय अनेक महत्त्वाची नोंदवलेली तथ्येही गोळा करण्यात आली आहेत. नंतर बहंगा स्थानकात खासगी नंबर एक्सचेंज बुक तपासले. यावेळी टीमने रिले रूम, पॅनल रूम आणि डेटा लॉकर सील केले आहे.

Web Title: bhubanehwar odisha train tragedy cbi detains 5 people including an officer seals bahanga station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.