भाजप नगरसेविकेचा हायव्होल्टेज ड्रामा! पक्षावर आरोप अन् काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन तासांत पुन्हा कमळ हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:01 IST2026-04-08T12:53:47+5:302026-04-08T13:01:28+5:30

गुजरातमध्ये सेजल गोहेल यांच्या दोन तासांच्या पक्षांतराने भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.

Bhavnagar Politics Former BJP Corporator Joins Congress Returns to BJP Within Two Hours | भाजप नगरसेविकेचा हायव्होल्टेज ड्रामा! पक्षावर आरोप अन् काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन तासांत पुन्हा कमळ हाती

भाजप नगरसेविकेचा हायव्होल्टेज ड्रामा! पक्षावर आरोप अन् काँग्रेसमध्ये प्रवेश, दोन तासांत पुन्हा कमळ हाती

Gujarat Election: गुजरातमध्ये २६ एप्रिल रोजी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भावनगरमध्ये सोमवारी एका महिला नगरसेविकेच्या पक्षप्रवेशाने मोठा राजकीय भूकंप झाला. मात्र काही तासांतच वेगळं चित्र पाहायला मिळालं. भाजपच्या माजी नगरसेविकेचा सकाळी काँग्रेसमध्ये प्रवेश आणि अवघ्या काही तासांतच पुन्हा घरवापसी, या नाट्यमय घडामोडींची सध्या राज्यभर चर्चा रंगली आहे.

सकाळी भाजपवर गंभीर आरोप

भावनगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या माजी नगरसेविका सेजल गोहेल (३०) यांनी सोमवारी सकाळी सर्वांना धक्का देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपमध्ये नगरसेविका असूनही मी सुरक्षित नाही, असे खळबळजनक विधान त्यांनी केले होते. तसेच, शहरातील अवैध दारूविक्रेत्यांचा वाढता उपद्रव आणि सामाजिक असुरक्षिततेचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता.

संध्याकाळी पुन्हा भाजपचा जप

सकाळी भाजपवर तोफ डागणाऱ्या सेजल गोहेल यांनी संध्याकाळ होताच पुन्हा भाजपचे कार्यालय गाठले आणि पक्षात प्रवेश केला. या नाट्यमय घडामोडीनंतर त्यांनी आपल्या विधान मागे घेतले. काँग्रेस नेत्यांनी माझी दिशाभूल केली होती, त्यांच्या दबावाखाली येऊन मी चूक केली. पण चूक कळताच मी पुन्हा माझ्या मूळ पक्षात (भाजप) परतले आहे," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. महत्त्वाचे म्हणजे, ज्या काँग्रेस नेत्यांनी त्यांची दिशाभूल केली, त्यांची नावे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

'आम्ही कोणालाही बोलावले नव्हते'; काँग्रेसचा पलटवार

सेजल गोहेल यांच्या आरोपांनंतर भावनगर शहर काँग्रेसचे अध्यक्ष मनोहरसिंह गोहिल यांनी त्यांची बाजू मांडली. "सेजल गोहेल या गेल्या ३-४ महिन्यांपासून आमच्या संपर्कात होत्या. त्या स्वतःहून आमच्याकडे आल्या होत्या. आम्ही त्यांना कोणतेही आश्वासन किंवा निवडणुकीचे तिकीट देण्याचे वचन दिले नव्हते. त्यांनी स्वतः सुरक्षेच्या कारणास्तव भाजप सोडत असल्याचे मीडियासमोर सांगितले होते. आता त्यांच्यावर नेमका कोणाचा दबाव आला हे त्यांनाच ठाऊक," असं गोहिल म्हणाले.

दरम्यान, गुजरातमध्ये १५ महानगरपालिका, ८४ नगरपालिका, ३४ जिल्हा परिषदा आणि २६० तालुका पंचायतींसाठी २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. २८ एप्रिल रोजी याचे निकाल जाहीर होतील.

Web Title : गुजरात: भाजपा पार्षद का नाटकीय यू-टर्न, कांग्रेस में एंट्री, फिर भाजपा में!

Web Summary : गुजरात में भाजपा पार्षद सेजल गोहेल कांग्रेस में शामिल हुईं, भाजपा में असुरक्षा का आरोप लगाया। कुछ घंटों बाद, वह लौट आईं, कांग्रेस पर गुमराह करने का आरोप लगाया। कांग्रेस ने दबाव से इनकार किया। स्थानीय चुनाव नजदीक।

Web Title : Gujarat BJP corporator's dramatic U-turn: Congress entry, then back to BJP!

Web Summary : Gujarat corporator Sejal Gohel joined Congress, alleging insecurity in BJP. Hours later, she returned, blaming Congress for misleading her. Congress denies pressuring her. Local elections loom.