Bharat Bandh : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 17:33 IST2018-09-10T17:32:43+5:302018-09-10T17:33:37+5:30
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशभरात प्रतिसाद मिळाला.

Bharat Bandh : अन् काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्या नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा
मुंबई - पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींविरोधात काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी पुकारलेल्या भारत बंदला आज देशभरात प्रतिसाद मिळाला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. मात्र त्याचदरम्यान केंद्र सरकारचा निषेध करताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चक्क नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार पाहायला मिळाला. काँग्रेस कार्यकर्ते नरेंद्र मोदी झिंदाबादच्या घोषणा देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.