शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तुरुंगवासादरम्यान ८ वर्षांत मिळवल्या ३१ पदव्या, बाहेर पडताच मिळाली सरकारी नोकरी

By बाळकृष्ण परब | Published: November 09, 2020 10:59 AM

Education News : तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण समोर आलं आहे.

ठळक मुद्देगुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या मिळवल्या

अहमदाबाद - जिद्द असेल तर माणूस परिस्थितीसमोर हार न मानता काहीही साध्य करू शकतो, असं म्हटलं जातं. ही बाब एका कैद्याने तंतोतंत खरी करून दाखवली आहे. साधारणपणे तुरुंगात गेल्यानंतर कैद्याचं आय़ुष्य हे नैराश्यमय होतं किंवा असे कैदी आधीच्यापेक्षा अधिक सराईत गुन्हेगार बनतात. मात्र तुरुंगात गेल्यानंतर आपल्या पुढील जीवनाला चांगली दिशा देणारे कैदी फारच थोडे असतात. असंच एक दुर्मीण उदाहरण गुजरातमधून समोर आलं आहे.गुजरातमधील भावनगर येथील भानूभाई पटेल यांनी तुरुंगात राहून आठ वर्षांत दोन चार नव्हे तर तब्बल ३१ पदव्या मिळवल्या. त्यांच्या या कर्तृत्वामुळे तुरुंगातून बाहेर पडताच सरकारी नोकरी मिळवली. भानूभाई एवढ्यावरच थांबले नाहीत तर नोकरी मिळाल्यानंतर पुढच्या पाच वर्षांत त्यांनी अजून २३ पदव्या मिळवल्या. त्यामुळे भानूभाईंचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, युनिव्हर्सल रेकॉर्ड फोरम आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये नोंद झाले.५९ वर्षांच्या वर्षांचे भानूभाई पटेल हे मूळचे भावनगरमधील महुवा तालुक्यातील रहिवासी आहेत. अहमादाबादमधील बीजे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएसची पदवी घेतल्यानंतर १९९२ मध्ये मेडिकलच्या पदवीसाठी ते अमेरिकेत गेले होते. तिथे त्यांचा एक मित्र विद्यार्थी व्हिजावर काम करून आपला पगार भानूभाईंच्या खात्यात ट्रान्सफर करत असे. त्यामुळे त्यांच्यावर फॉरेन एक्सचेंज रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या उल्लंघनाचा आरोप झाला होता. तसेच वयाच्या ५० व्या वर्षी १० वर्षांची शिक्षा झाली. त्यामुळे त्यांना अहमदाबादमधील कारागृहात १० वर्षे शिक्षा भोगावी लागली. याकाळात त्यांनी आठ वर्षांत एकूण ३१ पदव्या मिळवल्या.

सर्वसाधारणपणे तुरुंगात गेलेल्या व्यक्तीला सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र तुरुंगातून मुक्त झाल्यानंतर भानूभाई यांना आंबेडकर विद्यापीठाने नोकरीची ऑफर दिली. या नोकरीदरम्यान त्यांनी ५ वर्षांत अजून २३ पदव्या मिळवल्या. अशाप्रकारे आतापर्यंत त्यांच्या नावावर एकूण ५४ पदव्यांची नोंद झाली आहे.दरम्यान, भानूभाई यांनी लॉकडाऊनच्या कालावधील आपले तुरुंगातील अनुभव आणि विश्वविक्रमापर्यंतच्या प्रवासावर आधारित तीन पुस्तके गुजराती, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिहिली. भानूभाई यांनी गुजरात विधानसभा निवडणुकीत प्रिसायडिंग ऑफिसर म्हणूनही काम केले आहे.नॅशनल क्राइम ब्युरोच्या एका रिपोर्टनुसार गुजरातमधील तुरुंगांमध्ये अशिक्षित कैद्यांपैक्षा शिक्षित कैद्यांचे प्रमाण अधिक आहे. यामध्ये पदवी, इंजिनियरिंग, पदव्यूत्तर पदवी मिळवेल्या कैद्यांचा समावेश आहे. गुजरातमधील तुरुंगात ४४२ पदवीधर, १५० टेक्निकल डिग्री-डिप्लोमाधारक, २१३ पदव्युत्तर पदवीधारक कैदी आहेत. बहुतांश कैदी हे अपहरण आणि हत्येसारख्या गुन्ह्यांची शिक्षा भोगत आहेत.

टॅग्स :jailतुरुंगEducationशिक्षणGujaratगुजरात