भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सेवक, चालक, केअर टेकर दोषी; इंदूर कोर्टाचा निकाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 14:49 IST2022-01-28T14:24:59+5:302022-01-28T14:49:25+5:30
२०१८ मध्ये भय्यू महाराजांनी स्वत:वर गोळी झाडून केली होती आत्महत्या

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सेवक, चालक, केअर टेकर दोषी; इंदूर कोर्टाचा निकाल
इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदूर न्यायालयानं महत्त्वाचा निकाल दिला आहे. मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी संध्याकाळपर्यंत शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. सेवकांनी केलेल्या छळामुळेच भय्यू महाराजांनी आत्महत्या केल्याचं न्यायालयानं निकाल देताना म्हटलं.
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात सत्र न्यायालयात साडे तीन वर्षे सुनावणी चालली. न्यायमूर्ती धर्मेंद्र सोनी यांनी महाराजांचे सेवक असलेल्या शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांना महाराजांच्या आत्महत्या प्रकरणात दोषी ठरवलं. या तिघांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केलं, असं न्यायमूर्तींनी निकाल देताना म्हटलं.
काही सेवकांना भय्यू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबीयांपेक्षा जास्त महत्त्व दिलं. त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. आपल्या आश्रमाची आणि कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली, त्याच सेवकांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. हा छळ इतका जास्त होता की त्यांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं, असं सोनी यांनी निकाल सुनावताना म्हटलं.