भगवंत मान यांचा सरकार स्थापन करण्यासाठी दावा; पंजाबच्या राज्यपालांची घेतली भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 08:41 IST2022-03-13T08:08:27+5:302022-03-13T08:41:19+5:30
पंजाबच्या १९९१च्या तुकडीचे आयएएस अधिकारी ए. वेणुप्रसाद हे मुख्यमंत्र्यांचे नवे प्रधान सचिव होण्याची शक्यता आहे.

भगवंत मान यांचा सरकार स्थापन करण्यासाठी दावा; पंजाबच्या राज्यपालांची घेतली भेट
चंदीगड : आम आदमी पार्टीच्या (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते भगवंत मान यांनी आज चंदीगढ स्थित राजभवनात जाऊन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांची भेट घेतली, तसेच सरकार स्थापन करण्याचा दावा दाखल केला. आपच्या ९२ आमदारांची यादी मान यांनी राज्यपालांना सादर केली आहे. आपच्या विधिमंडळ पक्षाची एक बैठक शुक्रवारी मोहालीत झाली होती. या बैठकीत मान यांची नेतेपदावर एकमताने निवड करण्यात आली.
पंजाबच्या १९९१च्या तुकडीचे आयएएस अधिकारी ए. वेणुप्रसाद हे मुख्यमंत्र्यांचे नवे प्रधान सचिव होण्याची शक्यता आहे.
आपच्या वतीने रविवारी अमृतसरमध्ये रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे त्यात सहभागी होणार आहेत.