शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भगतसिंगांना ठरविले ‘दहशतवादी’

By admin | Updated: April 28, 2016 04:09 IST

दिल्ली विद्यापीठाने आपल्या पाठ्यपुस्तकात शहीद भगतसिंग यांना ‘दहशतवादी’ संबोधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाने आपल्या पाठ्यपुस्तकात शहीद भगतसिंग यांना ‘दहशतवादी’ संबोधल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मृदुला मुखर्जी आणि विपीन चंद्रा यांनी लिहिलेल्या ‘इंडियाज स्ट्रगल फॉर इंडीपेंडेंस’ नावाच्या या पुस्तकात ही घोडचूक करण्यात आली आहे.भगतसिंग यांच्यासोबतच चंद्रशेखर आझाद, सूर्य सेना आणि अन्य लोक हे ‘क्रांतिकारी दहशतवादी’ होते, असे या पुस्तकात म्हटले आहे. या पुस्तकात चित्तगाव आंदोलन आणि सँडर्स हत्याकांडाला ‘दहशतवादी कृत्य’ संबोधण्यात आले आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर अनेक लेखक आणि इतिहासकारांनी पुस्तकातील हा संदर्भ हटविण्याची जोरदार मागणी केली आहे. शून्य तासात भाजपचे सदस्य अनुराग ठाकूर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात देशातील शिक्षण संपविण्याचा आणि इतिहासाचा विपर्यास करण्याचा प्रयत्न केला. यासाठी देश काँग्रेसला कधीही माफ करणार नाही, असे ठाकूर म्हणाले.ठाकूर यांनी या पुस्तकाच्या आडून काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, या पुस्तकात राहुल गांधींना करिश्माई नेता संबोधणे हास्यास्पद आहे. कारण त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने लोकसभेची निवडणूक लढली आणि इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसला सर्वांत कमी ४४ जागा जिंकता आल्या.ठाकूर यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस सदस्य भडकले आणि त्यांनी ठाकूर यांच्याशी वाद घातला. यावेळी सभागृहात गदारोळ झाला, त्यामुळे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)पुस्तकातील मजकूर वगळण्याचे आश्वासनकेंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी ‘शैक्षणिक हत्या’ अशा शब्दात या पुस्तकातील संदर्भाचा निषेध केला. या पुस्तकातील हा मजकूर वगळण्यात येईल, असे आश्वासन इराणी यांनी सभागृहात दिले. भगतसिंगांना दहशतवादी संबोधण्यात आल्याचा मुद्दा लोकसभेतही उपस्थित करण्यात आला. भगतसिंग यांना ‘क्रांतिकारी दहशतवादी’ आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना ‘करिश्माई नेता’ संबोधण्यात आल्यावरून लोकसभेत सत्तारूढ पक्षाचे सदस्य आणि विरोधी सदस्यांत आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.